---Advertisement---

माजी दिग्गजाने विराट कोहलीच्या फाॅर्मविषयी व्यक्त केली चिंता! म्हणाला…

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2025 5:20 PM
virat kohli and rohit sharma
---Advertisement---

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) हायवोल्टेज सामना उद्या (23 फेब्रुवारी) रोजी भारत-पाकिस्तान संघात रंगणार आहे. दरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघातील हा अटीतटीचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतासाठी विराट कोहलीचे (Virat Kohli) एकाच प्रकारे बाद होणे ही चिंतेची बाब आहे, असे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचे मत आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कोहली ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या चेंडूंवर बाद झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 22 धावा केल्यानंतर तो बाद झाला. वनडे सामन्यांमध्ये कोहलीला सलग 6 वेळा फिरकी गोलंदाजांनी बाद केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या अलिकडच्या वनडे मालिकेत तो लेग-स्पिनर आदिल रशीदविरुद्ध संघर्ष करताना दिसला.

इंडिया टुडेशी बोलताना महान दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) कोहलीविषयी म्हणाले की, “मुख्य कारण म्हणजे त्याच्या बॅटचा चेहरा उघडा राहतो आणि तो कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो. बॅटचा चेहरा उघडा असल्याने तो अडचणीत येत आहे. त्याला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बांगलादेशविरुद्ध मनगटाचा फिरकी गोलंदाज रिशाद हुसेनचा चेंडू कापण्याच्या प्रयत्नात कोहली बॅकवर्ड पॉईंटवर झेलबाद झाला.”

पुढे बोलताना गावस्कर म्हणाले, “रिशाहदच्या टर्निंग बॉलवरही त्याच्या बॅटचा चेहरा उघडा होता. त्यांना हे थांबवावे लागेल. पण जर तो सतत त्याच प्रकारच्या गोलंदाजीवर बाद होत असेल तर तो चिंतेचा विषय आहे.”

2023च्या वनडे विश्वचषकात विराट कोहलीने 11 सामन्यांमध्ये 765 धावा केल्या पण त्यानंतर त्याला या फॉरमॅटमध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यानंतर, त्याने वनडे सामन्यांमध्ये 6 डावांमध्ये 22.83च्या सरासरीने फक्त 137 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्येही 2024 पासून, तो 11 सामन्यांमध्ये फक्त 440 धावा करू शकला आहे.

भारत-पाकिस्तान संघातील सामन्यात उद्या (23 फेब्रुवारी) रोजी विराट कोहली सातत्यपूर्ण कामगिरी करेल का? हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरेल.

आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरूद्ध विराट कोहलीची कामगिरी-
धावा- 645
डाव- 14
फलंदाजी सरासरी- 80.62
अर्धशतक/ शतक- 6/1

महत्त्वाच्या बातम्या-

भारत विरुद्ध पाकिस्तान: शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात कोण चमकले, कोण झाले नामोहरम?
भारत-पाकिस्तान दुबईत समोरासमोर .,केव्हा कुठे पाहता येणार लाईव्ह सामना जाणून घ्या एका क्लिकवर
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मध्ये होणाऱ्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हेन मध्ये कोणाला जागा मिळणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---