---Advertisement---

भारत-पाकिस्तान दुबईत समोरासमोर .,केव्हा कुठे पाहता येणार लाईव्ह सामना जाणून घ्या एका क्लिकवर

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2025 4:40 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील सगळ्यात महत्त्वाचा सामना भारत आणि पाकिस्तान संघामध्ये दुबईच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारत-पाकिस्तान रविवारी समोरासमोर असणार आहेत. चाहते हा सामना घरी बसून लाईव्ह बघू शकतात. भारत पाकिस्तान सामन्याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी मधील सर्व सामने टीव्ही शिवाय मोबाईलवर सुद्धा बघितले जाऊ शकतात.

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी मधील पहिला सामना बांगलादेशच्या विरुद्ध खेळला. हा सामना त्यांनी 6 विकेट्सनी जिंकला, भारतीय संघासाठी शुबमन गिलने शतकी खेळी केली. आता भारत आणि पाकिस्तान संघामध्ये रविवारी 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता सामना सुरू होईल. भारतीय संघ या सामन्यानंतर त्यांचा चॅम्पियन्स ट्रॉफी मधील शेवटचा ग्रुप सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. हे सर्व सामने चाहते टीव्ही आणि मोबाईलवर सुद्धा बघू शकतात.

भारत आणि पाकिस्तान संघामध्ये खेळला जाणारा सामना तुम्ही जिओ हॉटस्टार ॲपवर फ्रीमध्ये पाहू शकता. यासाठी मोबाईल मध्ये तुम्हाला ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ॲप मध्ये लॉगिन करावे लागेल. भारत पाकिस्तान सामना लाईव्ह टीव्हीच्या स्टार स्पोर्ट्स चॅनेल वर पाहता येणार आहे तिथे तुम्ही सामना पाहू शकता.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील ग्रुप ए मधील न्युझीलँड संघ पॉईंट्स टेबल मध्ये टॉपच्या स्थानी आहे. न्यूझीलंड संघाने एक सामना खेळून तो जिंकला आहे. न्यूझीलंड संघाचा नेट रन रेट + 1.200 आहे तर त्यांचे 2 पॉईंट्स आहेत. भारत या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाचे सुद्धा 2 पॉईंट्स आहेत. तसेच भारतीय संघाचा नेट रन रेट +0.408 आहे. बांगलादेश तिसऱ्या स्थानी तर पाकिस्तान चौथ्या स्थानी आहे. ग्रुप बी मध्ये पॉईंट्स टेबलवर दक्षिण आफ्रिका टॉपच्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका संघाकडे 2 पॉईंट्स आहेत. त्यांनीही एक सामना खेळून तो जिंकलेला आहे. अफगाणिस्तान संघाने एक सामना खेळून त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा 

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मध्ये होणाऱ्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हेन मध्ये कोणाला जागा मिळणार?

चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाक संघर्ष: कोणत्या क्षणांनी जिंकली मने?

“भारत-पाक सामन्यानंतर पाकिस्तानमध्ये टीव्ही सुरक्षित असणार? माजी खेळाडूने दिले मोठे वक्तव्य”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---