Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिटमॅन चोपणारच! भारतीय दिग्गजाला रोहितकडून मोठ्या धावांची अपेक्षा

November 7, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2022 मध्ये काही खास कामगिरी करू शकला नाहीये. फलंदाजाच्या रूपात त्याची बॅट अद्याप शांतच दिसत आहे. भारतीय संघ जिंकत असला तरी, रोहितच्या खराब फॉर्ममूळे संघ व्यवस्थापन नक्की चिंतेत असेल.‌ रोहित फॉर्ममध्ये यावा, अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे. त्याचवेळी भारतीय संघाचे माजी कर्णधार व समालोचक सुनील गावसकर यांनी देखील त्याच्या सध्याच्या फॉर्मविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहितकडून भारतीय संघाला मोठी अपेक्षा होती. टी20 विश्वचषकात कर्णधार म्हणून खेळत असलेल्या रोहितकडे देखील स्पर्धेच्या इतिहासात 1000 धावा करण्याची नामी संधी चालून आलेली. मात्र, नेदरलँड्सविरूद्धचे अर्धशतक वगळता त्याला भरीव कामगिरी करता आली नाही. साखळी फेरीत कोणत्याच मोठ्या संघाविरुद्ध त्याला विशेष कामगिरी करण्यात यश आले नव्हते. रोहितच्या एकूण कामगिरीनंतर भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी म्हटले,

“रोहितचा फॉर्म हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. मात्र, मला अपेक्षा आहे की, त्याच्या महत्त्वाच्या धावा स्पर्धेच्या मोठ्या सामन्यांमधून नक्कीच येतील. तो एक शानदार खेळाडू आहे.”

भारतीय संघाने साखळी फेरीतील ब गटात अव्वल स्थानी राहत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघ इंग्लंडचा सामना करेल. रोहितबाबत बोलायचे झाल्यास, त्याने स्पर्धेत आत्तापर्यंत पाच सामन्यांच्या पाच डावात 17.80 च्या मामुली सरासरीने व 108 च्या स्ट्राईक रेटने 109 धावा केल्या आहेत. केवळ नेदरलँड्सविरूद्ध त्याने 53 धावांची खेळी केली होती. (Sunil Gavaskar Hoping Rohit Sharma Score Big In Semi Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! रे*प केसचा आरोपी धनुष्का गुणतिलकाची श्रीलंका संघातून हकालपट्टी, जामीनही नाही मिळाला
वाईट काळात केवळ ‘या’ व्यक्तीने वाढवला विराटचा आत्मविश्वास; स्वतः केला खुलासा

 

 

 


Next Post
Rishabh Pant & Rohit Sharma

शास्त्री गुरूजी म्हणतायेत, "सेमी-फायनलमध्ये रिषभ टीम इंडियाचा एक्स फॅक्टर ठरेल"

Cricketer-Suryakumar-Yadav

भारतीय दिग्गज म्हणतोय, "सूर्या माझ्यासाठी आत्ताच मॅन ऑफ द टूर्नामेंट"

Photo Courtesy: Twitter/ Virat Kohli

एक दोन नव्हेतर दहा! आयसीसी पुरस्कारांमध्येही कोहलीच किंग; अशी आहे लांबलचक यादी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143