भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सोमवारी(11 जानेवारी) पार पडला. हा सामना भारतीय संघाच्या आर अश्विन आणि हनुमा विहारी या दोघांनी अत्यंत चिवट खेळी करत अनिर्णित राखला. भारतीय संघाला या सामन्यात 407 धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाकडून पाचव्या दिवसाखेर 131 षटकांत 5 गडी गमावून 334 धावा करण्यात आल्या. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनवर टीका केली.
भारतीय संघाने चौथ्या दिवस अखेर 2 बाद 98 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे 4 धावांवर बाद झाला. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाला वाटले हा सामना आपण जिंकल्यात जमा आहे. मात्र त्यानंतर रिषभ पंतने अचानक हल्ला चढवत आक्रमक 97 धावांची खेळी केली. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराने 77 धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारतीय संघ एकावेळेस हा सामना जिंकेल अशी अपेक्षा होती.
मात्र, हनुमा विहारी या सामन्यात जखमी झाल्याने त्याला धावता येत नव्हते. त्यामुळे विहारी आणि अश्विन या दोघांनी सामना अनिर्णित राखायचे ठरवले व त्या दोघांनी हे करून दाखवले. कारण मागून फलंदाजीला येणारे सैनी आणि बुमराह नियमित फलंदाज नव्हते. त्यामुळे या दोघांनी सामना अनिर्णित करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याचबरोबर यशस्वीपणे पार पाडली.
टीम पेनच्या वर्तनामुळे चिडले सुनील गावसकर
तिसरा कसोटी सामना जरी अनिर्णित राहिला असला, तरी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन टीकेचा धनी ठरला आहे. पुजारा आणि पंत बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला हा सामना जिंकण्याच्या शक्यता वाढल्या. त्यामुळे टीम पेन भारतीय फलंदाजांना त्रास देण्यासाठी स्लेजींग करू लागला. जेणेकरून भारतीय फलंदाजाचे लक्ष विचलित व्हावे. त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतु प्रयत्न हे प्रयत्नचं राहिले. त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही. त्याच्या या वर्तनावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर खूप चिडले आणि त्यांनी टीम पेनवर टीका केली.
कर्णधार म्हणून काही दिवसच शिल्लक राहिलेत
सुनील गावसकर म्हणाले, “मला माहित नाही. मी ऑस्ट्रेलियाचा निवडकर्ता नाही. मात्र कर्णधार म्हणून त्याचे दिवस मोजण्या इतकेच राहिले आहेत. तुम्ही भारतीय संघाला विकेट न घेता 130 षटके फलंदाजी करू देता. हा खूप चांगले ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे आक्रमण आहे. तुम्ही गोलंदाजी मध्ये बदल करून, क्षेत्ररक्षकांना योग्य ठिकाणी उभा करून परिणाम बदलू शकत होता.”
“टीम पेन आपली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बदलण्याऐवजी भारतीय फलंदाजासोबत बोलण्याचा जास्त प्रयत्न करत होता. मालिका संपल्यानंतर जर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार बदलला गेला, तर मला आश्चर्य वाटणार नाही. तुम्ही सोपे झेल सोडत आहात. दोनवेळा चेंडूने रिषभ पंतनच्या बॅटची बाह्य कडा घेतली होती. ते झेल अवघड नव्हते. विहारीचा झेल तो स्लिपमध्ये जाऊ देवू शकत होता. ”
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून डेविड वॉर्नरने मागितली मोहम्मद सिराज आणि भारतीय संघाची माफी