---Advertisement---

बड्या कसोटीपटूकडून लयीत नसलेल्या पुजाराचा बचाव; म्हणे, ‘त्याच्याऐवजी रोहितला बाहेर करा’

On: रविवार, जून 27, 2021 12:57 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याने कसोटी क्रिकेटचा वारसा पुढे नेला आहे. दिग्गज कसोटीपटू राहुल द्रविडनंतर पुजाराला भारतीय संघाची ‘नवी द वॉल’ असे संबोधण्यात येऊ लागले. परंतु हाच पुजारा सध्या आपल्या संथ फलंदाजीमुळे टीकेचा धनी ठरला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात सपशेल फ्लॉप ठरल्याने त्याचे संघातील स्थानही धोक्यात आले आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

शतक करण्यात अपयश
पुजारा मागील २ वर्षांपासून खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याने बऱ्याचशा कसोटी सामन्यात दमदार खेळी केली आहे. परंतु तो एकही शतक मारण्यात यशस्वी ठरला नाही. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात तर त्याची बॅट खूप शांत राहिली. पहिल्या डावात तो फक्त ८ धावांवर बाद झाला; तर दुसऱ्या डावात १५ धावांवर त्याला पव्हेलियनला परतावे लागले. त्यामुळे पुजाराच्या जागी केएल राहुल किंवा हनुमा विहारीला आगामी कसोटी सामन्यांमध्ये संधी दिली जाण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

काय म्हणाले सुनिल गावसकर?
यासंबंधी महान कसोटीपटू गावसकर यांना विचारले असता त्यांनी पुजाराचा बचाव केला. स्पोर्ट्स तकशी बोलताना ते म्हणाले की, “पुजाराने ऐतिहासिक सामन्यात अतिशय हळूवार खेळी केली, हे मला मान्य आहे. पण न्यूझीलंड संघाकडून डेवॉन कॉनवे, कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनीही अतिशय संथ सुरुवात केली होती. खरे तर, पुजारा एका बाजूने डाव सांभाळत असतो. जेणेकरुन दुसऱ्या बाजूने फलंदाज मोठमोठे फटके मारु शकतो.”

पुढे पुजाराच्या संघातील स्थानाबद्दल गावसकर म्हणाले, “माझ्या मते, पुजाराला संघाबाहेर करण्याऐवजी सलामीवीर रोहित शर्माला बाहेर करावे. रोहितच्या जागी मयंक अगरवालला शुबमन गिलसोबत सलामीला संधी दिली गेली पाहिजे.”

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाविरुद्ध षड्यंत्र, पंचांमुळे हुकले ‘या’ खेळाडूचे शतक

‘या’ कारणामुळे कोहलीने किवी समर्थकांना तोंडावर बोट ठेऊन शांत बसण्याचा केला होता इशारा

पुजाराच्या सुमार फलंदाजीने संघ व्यवस्थापनाला विचार करण्यास पाडले भाग, इंग्लंडविरुद्ध मिळणार डच्चू!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---