इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारताने पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. ज्यामध्ये भारतीय संघाच्या दोन्ही विभागांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. भारताच्या विजयात शेवटच्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व राखले होते. तर पहिल्या दिवसापासून भारतीय फलंदाजांनी देखील कमाल केली होती.
भारताचे सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी लॉर्ड्सच्या मैदानात शतकीय भागीदारी करत विक्रम केला. ज्यात राहुलच्या शतकीय खेळीमुळे तो कौतुकास पात्र झाला. तसेच रोहितने देखील ८३ धावांची खेळी केली. मात्र, थोड्याशा अंतराने आपल्या शतकापासून रोहितला वंचित राहावे लागले. असे असले तरी भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहितच्या या खेळीचे कौतुक केले आहे.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्क सोबत बोलताना गावसकर म्हणाले, “पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल, याबाबत कोणताच खेळाडू लवकर अंदाज बांधू शकत नाही. पीच खेळण्यासाठी पूरक आहे, की नाही? किंवा या पीचवर चेंडू कसा उसळू शकतो? याचा अंदाज बांधणे कठीणच यासाठी फलंदाजाला काही वेळ द्यावा लागतो. लॉर्ड्सच्या मैदानात पहिल्या डावात रोहितने ते करून दाखवले.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “रोहितने उत्कृष्टपणे खेळी केली. कोणता शॉट खेळावा कोणता नाही, याची निवडही त्याने चांगली केली. त्याला खेळताना पाहिले तर समजेल की, त्याने किती चेंडू सोडले. त्यातील काही चेंडू तर ऑफ स्टंपच्या एकदम जवळ होते. यामध्ये रोहितने खूप मेहनत घेतलेली दिसून येते.”
“अशीच अपेक्षा आपल्याला एका खेळाडूकडून असते. जर तुमच्याकडे असा खेळाडू असेल जो ८० धावा करण्याचे आश्वासन देतो. असा खेळाडू ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत जवळपास ४००-४५० धावा सहज करू शकतो. अशात कर्णधाराला आणखी काय हवे. हा मात्र, शतक न झाल्यामुळे तो थोडा निराश झाला असेल. परंतु लॉर्ड्समध्ये शतक बनवणेच सर्वकाही नाही.” असेही गावसकर म्हणाले.
तसेच गावसकर यांच्यामते रोहित शर्मा त्याचे पुढचे शतक करण्याच्या अत्यंत जवळ आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, “जर तुम्ही ट्रेंट ब्रिज किंवा लीड्सच्या मैदानात शतक बनवत असाल. किंवा तुम्ही जगातल्या कोणत्याही कोपर्यातून भारतीय संघासाठी शतक बनवत असताल, तर ते अत्यंत महत्त्वपूर्ण बनून जाते. ज्याप्रकारे रोहीत फलंदाजी करत आहे. यावरून स्पष्ट होते की, लवकरच तो आपले पुढचे शतक करू शकतो.”
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडींग्ले मैदानात २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी दोन्ही संघांचे जोरदार तयारी चालू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–चोरी प्रकरणात बीसीसीआयने हस्तक्षेप करण्याची रसूलची मागणी, म्हणाला…
–टेलएंडरची कमाल! शमीनंतर झिम्बाब्वेच्या ८ व्या क्रमांकाच्या खेळाडूने २४२ च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या ‘इतक्या’ धावा
–काय सांगताय! अवघ्या १४ वर्षाच्या पोरानं ९८ चौकारांसह ठोकल्या होत्या तब्बल ५५६ धावा