आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी संघांची घोषणा झाली आहे. यापूर्वी अशी शक्यता निर्माण झाली होती की, विराट कोहली आणि रोहित शर्मासह भारतीय संघाचे शीर्ष खेळाडू भाग घेतील. मात्र, निवडकर्त्यांनी जेव्हा चार संघांची घोषणा केली तेव्हा कसोटी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांची नावे नव्हती. याव्यतिरिक्त, बहुतांश खेळाडू या स्पर्धेचा भाग होण्यासाठी तयार आहेत.
विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्पर्धेचा भाग का नाहीत, हा प्रश्न बहुतांश चाहत्यांच्या मनात होता. याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, विराट आणि रोहितला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगून त्यांच्यावर ताण वाढवण्यात काही अर्थ नाही. त्यांना दुखापत होण्याचा धोका आहे. मात्र, याच मुद्द्यावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“निवडकर्त्यांनी दुलीप ट्रॉफीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड केली नाही. त्यामुळे ते कदाचित जास्त सराव न करता बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत जातील,” असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, “जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूला त्याच्या पाठीमुळे काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे हे समजण्यासारखे आहे. मात्र, फलंदाजांना काही काळ फलंदाजी करणे आवश्यक आहे. एकदा खेळाडू कोणत्याही खेळात 30 वर्षांचे झाल्यावर, नियमित स्पर्धा त्याला उच्च कामगिरी राखण्यास मदत करतात. कारण जेव्हा असे खेळाडू दीर्घ काळानंतर खेळतात तेव्हा त्यांच्या स्नायूंची हालचाल काहीशी मंद होती.”
विराट व रोहित यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ते दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची शक्यता वर्तवली जात होते. रोहित विराटसह जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी हेच कसोटी संघातील प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत. स्पर्धेला 5 सप्टेंबर पासून सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आधी 10 रुपये, आता संपूर्ण आयुष्याची कमाई…’, विनेश फोगटला भावाकडून रक्षाबंधनचे खास गिफ्ट
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाने दिला भारताला इशारा…!
ईशान किशनचा जोरदार कमबॅक! शेवटच्या ओव्हरमध्ये तुफानी षटकार मारत मिळवून दिला विजय