---Advertisement---

“पराभवानंतर रोहितला का प्रश्न विचारले जात नाहीत”, दिग्गजाचा थेट निवड समितीलाच सवाल

---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. मागच्या वर्षी आशिया चषक, त्यानंतर टी20 विश्वचषक आणि आता डब्ल्यूटीसी स्पर्धेत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. लागोपाठ तीन मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला अपयश अल्याने कर्णधार रोहित शर्मा याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. आता भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पुन्हा एकदा रोहितवर निशाणा साधला आहे.

भारतीय संघाच्या पराभवानंतर प्रत्येक खेळाडूवर अनेक समीक्षक व चाहते टीका करत आहेत. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी तर चेतेश्वर पुजारा याला भारतीय संघातून वगळले देखील गेले आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा याला निवड समिती पाठीशी घालत आहे का? असा सवाल गावसकर यांनी केला. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले,

“जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर कोणी रोहित शर्माला प्रश्न विचारले का? आमच्या वेळी निवड समिती असायची जी मोठ्या पराभवानंतर कर्णधाराला बोलावून त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत. पराभवाचे कारण विचारले जात. आता रोहितला कोणी प्रश्न विचारले का? अश्विनला का खेळवले नाही? नाणेफेक जिंकून गोलंदाजी का स्वीकारली? हेडला आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्यास उशीर का केला? असे प्रश्न विचारले जाणे गरजेचे आहे.”

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने एकतर्फी नमावले होते. या सामन्यातील भारतीय संघाचा रणनीतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले. रोहित शर्मासह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना देखील धारेवर धरण्यात आले होते.

(Sunil Gavaskar Slams Rohit Sharma After WTC Final Loss)

महत्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरुजींनी सुचवले टीम इंडियाचे नवे कॉम्बिनेशन! म्हणाले, “ते दोन जण संघात हवेत” 
यशस्वीचा राजस्थान रॉयल्सविषयी मोठा खुलासा! म्हणाला, “त्यांनी फक्त मला संधीच दिली नाही तर,…”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---