बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिजमधून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलने ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या मालिकेत आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तसेच भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका देखील बजावली होती. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याची इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली होती.
अशातच पहिला कसोटी सामना वगळता त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मागील पाच डावात त्याला एकच अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे. अशातच तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात अवघ्या ११ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय दिगज क्रिकेटपटू सुनिल गावसकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. आतापर्यंत खेळलेल्या ५ कसोटी सामन्यात गिल ला ३७८ धावा करण्यात यश आले आहे. याच कामगिरीवर माजी भारतीय क्रिकेटपटू गावसकर यांनी म्हटले आहे की, “शुबमन गिलमध्ये मोठे फटके खेळण्यासोबतच मोठी आकडी खेळी खेळण्याची देखील क्षमता आहे. परंतु, हा सलामीवीर फलंदाज सतत चुकीचा शॉट खेळत आपली विकेट गमवतोय. हा फलंदाज ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये जसा खेळला होता. तसा इंग्लंड विरुद्ध खेळतच नाहीये.”
तिसऱ्या कसोटी सामन्यात ११ धावा करण्यावर गावसकर म्हणाले…
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात गिलला अवघ्या ११ धावा करण्यात यश आले होते. यावर गावसकर म्हणाले, “जेव्हा तुम्ही चुकीचा शॉट खेळता, तेव्हा तुम्ही लवकर बाद होता. काही असच होत आहे या खेळाडूसोबत. हा फलंदाज २१ वर्षांचा आहे आणि त्याला खूप काही शिकायचं आहे. जेव्हा तुम्ही लवकर बाद होता त्यानंतर तुमचा आत्मविश्वास कमी होत जातो. गिलला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. परंतु,गिलने जॉफ्रा आर्चर विरुद्ध जो शॉट खेळला, तो निष्काळजीरित्या खेळलेला शॉट होता. एका जलद गोलंदाजाविरुद्ध तुम्ही अशा प्रकारचे शॉट खेळण्यायापासून सावध राहायला हवं.”
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा मोठा विजय
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या तिसरा कसोटी सामन्यात भारतीय संघाने दहा गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. या सामन्याचा शिल्पकार ठरला तो डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल. पटेलने उत्कृष्ट गोलंदाजी करत सामन्यात ११ गडी बाद केले. तर आर अश्विनला ७ गडी बाद करण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! तब्बल २६७७ चेंडूंचा सामना केल्यानंतर इशांतने मारला पहिला षटकार, पाहा व्हिडिओ
षटकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या रोहितचे विराटने ‘असे’ केले अभिनंदन, पाहा व्हिडिओ
“पहिल्या डावात जर आम्ही २५० धावा केल्या असत्या तर…”, इंग्लिश कर्णधाराने सांगितले पराभवाचे कारण