भारतीय संघ सलग दोन वेळा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला. पण दोन्ही वेळा संघाला पराभव स्वीकारावा लागला. यावेळी भारतीय संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळला आणि ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारला. असे असले तरी, संघाला नवीन कर्णधार देण्याची किंवा रोहित शर्मावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसली नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना आपले परखड मत मांडले.
भारतीय संघातील कमी समजावून सांगताना माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी संघाच्या कर्णधारपदाविषयी मत व्यक्त केले. त्यांच्या मते कर्णधार खराब खेळत असला, तरी त्याला बाहेर केले जात आहे. स्वतः कर्णधारालाही ही गोष्ट माहीत आहे, ज्यामुळे तो निश्चिंत असतो. संघाला एखात्या मालिकेत 4-0 असा पराभव मिळाला, तरीही संघातील आपले स्थान गमावण्याची चिंता कर्णधाराला नसते.
इंडियन एक्सप्रेसने गावसकरांच्या हवाल्याने सांगितले की, “तुम्ही जिंका किंवा पराबूत व्हा, कर्णधाराला माहीत आहे की, तो संघातून बाहेर होणार नाहीये. हे नवीन नाहीये. 2011 पासून असे होत आले आहे. असे झाले आहे, जेव्हा संघ सलग दोन वेळा 0-4 अशा अंतराने पारभूत झाला. पण कर्णधार बदलला नाही.” गावसकरांनी या विधानातून नाव न घेता माजी कर्णधार एमएस धोनीवर निशाणा साधला आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वात संघाने 2011-12मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन मालिका गमावल्या होत्या. संघाच्या या सुमार प्रदर्शनानंतरही धोनी कर्णधारपदावर कायम राहिला. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी-20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 2018-19मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकील. विराट भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक राहिला. पण तो संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकवून देऊ शकला नाही.
सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे नेतृत्व करत आहे. यावर्षी आशिया चषक आणि वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. रोहितच्या नेतृत्वातील भारताने यावर्षीचा विश्वचषक जिंकला, तर तो कपिल देव आणि एमएस धोनीनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरेल. (Sunil Gavaskar also targeted MS Dhoni along with Rohit Sharma)
महत्वाच्या बातम्या –
WIvsIND । दुसऱ्या कसोटीआधी स्कॉट्स मारताना निघाला विराटचा घाम! पाहा व्हिडिओ
‘आता कुणाशीच काही शेअर करत नाही…’, टीम इंडियातून बाहेर असलेला शॉ भावूक