भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या आपल्या कारकिर्दीतील खराब फॉर्ममध्ये आहे. शॉच्या नेतृत्वात भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. मात्र, सध्या हा गुणवंत फलंदाज राष्ट्रीय संघात जागा बनवण्यासाठी झगडत आहे. नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले. पण भारतीय संघात जागा मिळत नसल्यामुळे त्याने एका ताज्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात साऊथ झोन विरुद्ध वेस्ट झोन असा सामना रंगला होता. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) प्रियांक पंचाल याच्या नेतृत्वातील वेस्ट झोन संघासाठी खेळत होता. संघात त्याच्या साथीला चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव असे वरिष्ठ खेळाडूही होते. मात्र, तरीही त्यांचा संघ पराभूत झाला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शॉने सामन्याच्या पहिल्या डावात 101 चेंडूत 65 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण दुसऱ्या डावात तो 25 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. परिणामी त्याच्या संघाला साऊथ झोनकडून 75 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघातून बाहेर असलेल्या शॉने त्याला देशासाठी खेळण्याची संधी मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शॉ म्हणाला, “माहीत नाही त्याला वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी का निवडले गले नाही. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा तो खूपच दुःखी होता. मला जेव्हा संघातून वगळले गेले, तेव्हा याचे कारण समजले नव्हते. काहीजण म्हणत होते की, फिटनेसमुळे हा निर्णय घेतला गेला, पण मी तर एनसीएची फिटनेस चाचणी पार केली होती.”
“मी धावा केल्या आणि टी-20 संघात जागाही बनवली. पण वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघात जागा न मिळाल्यामुळे खूप दुःखी होतो. मी या निर्णयामुळे कोणाशी भांडूही शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. हा प्रसंग मागे टाकत पुढे जाणे, हाच पर्याय माझ्याकडे आहे,” असे शॉ पुढे म्हणाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शॉ आणि सपना गिल यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला होता. या प्रकरणानंतर शॉने चांगली धास्ती घेतल्याचे दिसते.
मुलाखतीत शॉ पुढे म्हणाला, “लोक माझ्याविषयी खूपकाही बोलत आहेत. पण जे मला ओळखतात त्यांना मी कसा आहे, हे माहीत आहे. माझ्याकडे मित्र नाहीत. पण मला मित्र बनवायला आवडत देखील नाही. नवीन पीढीसोबत असेच होत आहे. ते आपले विचार इतरांना सांगू शकत नाहीत. असे करायला भीती वाटते. माहीत नाही या गोष्टी कधी सोशल मीडियावर येतील. त्यामुळेच मी इतरांसोबत काहीच शेअर करत नाही.” (‘Now I don’t share anything with anyone…’, Prithvi Shaw, who is out of Team India, is emotional)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान वनडे संघाला मोठी विश्रांती, 2023 विश्वचषकानंतर खेळाडू एक वर्षांच्या सुट्टीवर
वेस्ट इंडीजसाठी युवा स्पिनर करणार कसोटी पदार्पण! दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा