भारतीय क्रिकेट संघाचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर सोमवारी (10 जुलै) आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या शानदार कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले. त्यांची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांत गणना केली जाते. त्यांनी आपल्या या वाढदिवशी आपल्या कारकिर्दीतील सर्वात आठवणीत राहणारा क्षण कोणता याबाबत खुलासा केला.
आपल्या सोळा वर्षापेक्षा अधिक मोठ्या कारकिर्दीत गावसकर यांनी अनेक विक्रम रचले. यादरम्यान तुमच्या कारकिर्दीतील सर्वात आठवणीतील क्षण कोणता असे विचारल्यानंतर ते म्हणाले,
“माझी कारकीर्द मोठी होती मात्र भारतीय संघाने जिंकलेला विश्वचषक हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. तेवढा आनंद मला नंतर कधी झाला नाही. आजही तो क्षण पाहून माझ्या डोळ्यात अश्रू येतात.”
ते पुढे बोलताना म्हणाले,
“इतक्या वर्षानंतरही कपिल देव यांनी उचललेली ती ट्रॉफी हा क्षण मी पाहत होतो त्या वेळी आपसूकच गहिवरून येते. वैयक्तिक खेळाडू म्हणून तुम्ही अनेक गोष्टी साध्य करता येतात. मात्र, जेव्हा तुमचा संघ इतकी मोठी गोष्ट मिळवतो तो आनंद वेगळाच असतो.”
भारतीय संघाने 1983 मध्ये कोणाच्याही बेरजेत नसताना मजबूत वेस्ट इंडीज संघाला पराभूत करत प्रथमच विश्वचषक जिंकला होता. गावसकर या संघात सलामीवीराची भूमिका पार पाडत होते. 1971 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकर यांनी आपल्या कारकीर्दीत 125 कसोटी सामने खेळताना 51 पेक्षा जास्तच्या सरासरीने 10,122 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारे ते पहिले फलंदाज होते. याव्यतिरिक्त 108 वनडे सामने देखील त्यांनी खेळले. 1985 मध्ये वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कर्णधार होते.
(Sunil Gavaskar Tell His Memorable Moment In His Life On His Birthday)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
सातासमुद्रापार विश्वविजेती बनली सातारची आदिती! तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये घेतला सुवर्णवेध