यंदा इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम यूएई येथे पार पडला. दरवर्षीप्रमाणे या हंगामातही चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. मात्र, असे असूनही काही गोलंदाजांनीही छाप सोडली.भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी या संपूर्ण हंगामाचे विश्लेषण केले आहे.
खेळाडू लपवून ठेवतात दुखापत
खेळाडूच्या दुखापतीबद्दल बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, “क्रिकेट खेळताना एखाद्या खेळाडूला बऱ्याच दुखापती झालेल्या असतात. म्हणून त्याचे नाव कितीही मोठे असले तरीही बहुतेक सामन्यांमध्ये तो उपलब्ध नसल्यास त्याला विकत घेण्यात काही अर्थ नाही. जेव्हा त्यांना परत दुखापत होते, तेव्हा संघाचे संतुलन आणि विजयाची लय यामध्ये बिघाड होतो. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू दुखापती लपवतात आणि एक सामना खेळल्यानंतर असे म्हणतात की त्यांना दुखापत झाली आहे जेणेकरून त्यांना सर्व पैसे मिळतील.”
हंगाम रोमांचक पद्धतीने पार पडला -सुनील गावसकर
खेळपट्टीची गुणवत्ता आणि शारजाह स्टेडियमव्यतिरिक्त इतर मोठे मैदान यामुळेच यूएई येथील आयपीएलचा 13 वा हंगाम रोमांचक पद्धतीने पार पडला. मोठे मैदान असल्यामुळे आपल्याला काही उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. इतर मैदानावर याच फटाक्यांवर षटकार गेले असते.
“याचा दुसरा पैलू असा आहे की जो खेळाडू त्याच्या सामर्थ्यासह खेळतो त्याची यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. संपूर्ण ताकदीने फटका मारणारा फलंदाज अनेकदा स्कूप शॉट किंवा रिव्हर्स स्वीप खेळू शकत नाही, ज्याची त्याला सवय राहात नाही. एक्सट्रा कव्हरवरून मारलेला फटका पाहण्यात आनंद वाटतो परंतु मैदान मोठे असल्यामुळे बरेच खेळाडू झेलबाद झाले.”
यॉर्कर चेंडू फेकणारा गोलंदाज अधिक प्रभावी
“ज्या गोलंदाजांनी विविधता आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी अनेकदा त्यांची लाईन व लेन्थ गमावली आणि त्याचा फटका त्याला सहन करावा लागला. विशेषत: वेगवान गोलंदाज, ज्याने हात वळवून कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्या सामान्य गोलंदाजीचा भाग नसल्यामुळे चूकून गेला. म्हणूनच त्याचे यावर फारसे नियंत्रण राहिले नाही. यावरून हेदेखील स्पष्ट होते की जर एखादा गोलंदाज चांगला यॉर्कर गोलंदाजी करू शकतो तर तो खेळाच्या या स्वरुपात अधिक प्रभावी ठरतो.” असेही पुढे बोलताना गावसकर म्हणाले.
….म्हणून आधुनिक खेळाडू अधिक ताकदीने खेळतात फटके
फलंदाजांनी मैदानाबाहेर फटके मारल्याबद्दल आपले विचार मांडताना गावसकर म्हणाले की, “षटकार मारल्यावर शारजाह स्टेडियमजवळील रस्त्यावर चेंडू जात होता हे पाहून आश्चर्य वाटलं . क्लाईव्ह लॉयड, व्हिव्ह रिचर्ड्स, गॉर्डन ग्रीनिज यासारख्या दिग्गजांचे हे आवडते स्टेडियम होते. चाहत्यांनी या स्टेडियममध्ये त्यानी मारलेल्या फटाक्यांचे झेल घेतले आहे. आधुनिक काळातील खेळाडू जिममध्ये घाम गळतात त्यामुळे ते अधिक ताकदीने फटके खेळतात. ही खरोखर चांगली बाब आहे.”
कमेंट्री बॉक्समध्ये ऐक्य राखून केलं काम
आयपीएलमध्ये समालोचन करतानाच्या आठवणींना उजाळा देत गावसकर म्हणाले की, “बायो-बबलमध्ये रहाणे आणि चार-पाच दिवसानंतर कोव्हिड 19 ची चाचणी करवून घेणे यात काहीच अडचण नव्हती. कमेंट्री बॉक्समध्ये ऐक्य राखून आम्ही सकारात्मक पद्धतीने काम केलं. या खेळात सर्वच खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. काही खेळाडूंनी केलेले प्रदर्शन उत्कृष्ट होते. तो अधिक चांगला क्षण होता.”