---Advertisement---

आयपीएलमध्ये सुनील नारायणचा इतिहास! असा विक्रम करणारा ठरला पहिलाच विदेशी खेळाडू

On: शनिवार, मे 16, 2026 9:01 PM
---Advertisement---

सुनील नारायणने शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो आयपीएल इतिहासात 200 सामने खेळणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला. ईडन गार्डन्सवर झालेल्या आयपीएल 2026 च्या 60व्या सामन्यात त्याने हा खास टप्पा गाठला. याआधी 12 भारतीय खेळाडूंनी आयपीएलमध्ये 200 हून अधिक सामने खेळले होते.

सुनील नारायणने 2012 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून पहिला सामना खेळला होता. गेल्या 14 हंगामांपासून तो कोलकाता संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. गोलंदाजीसह सलामीपासून खालच्या फळीपर्यंत फलंदाजी करत त्याने संघासाठी मोठे योगदान दिले आहे.

नारायणने 200 सामन्यांत 203 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो आयपीएलमध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला विदेशी गोलंदाज ठरला आहे. याआधी फक्त युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांनी हा पराक्रम केला होता. त्याने 200 सामन्यांत 1820 धावाही केल्या आहेत. आयपीएल 2026 मध्ये त्याने 11 सामन्यांत 11 विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली आहे.

दरम्यान, पहिल्या डावात खेळताना केकेआरने या बातमीखेरीस 17 षटकानंतर 205 धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर कॅमरुन ग्रीन व अंगकृष रघुवंशी आहेत.

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन:

कोलकाता नाईट रायडर्स :
फिन अ‍ॅलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, कॅमेरून ग्रीन, रिंकू सिंह, मनीष पांडे, सुनील नारायण, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती, कार्तिक त्यागी आणि सौरभ दुबे.

गुजरात टायटन्स :
शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, निशांत सिंधू, राशिद खान, अरशद खान, कगिसो रबाडा, साई किशोर आणि मोहम्मद सिराज.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---