शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) लखनऊमधील इकाना क्रिकेट स्टेडिअम येथे आयपीएल 2023 स्पर्धेचा 10वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याला 7.30 वाजता सुरुवात होणार आहेत. त्यापूर्वी 7 वाजता उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक एडेन मार्करम याच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाने जिंकली आणि चक्क फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात हैदराबाद संघ विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न करेल.
हैदराबाद संघ दोन बदलांसह मैदानात उतरणार आहे. तसेच, लखनऊ संघातही दोन बदल आहेत. लखनऊ संघात रोमॅरियो शेफर्ड आणि अमित मिश्रा या दोन खेळाडूंचे पदार्पण झाले आहे.
#SRH have won the toss and elect to bat first against #LSG at Lucknow.
Live – https://t.co/07o0jVbgvA #TATAIPL #LSGvSRH #IPL2023 pic.twitter.com/qIVKQ8uO7J
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
स्पर्धेतील कामगिरी
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. त्यातील एका सामन्यात लखनऊला विजय, तर दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. अशात केएल राहुल (KL Rahul) संघाला दुसरा विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या हंगामात नवीन कर्णधारासोबत उतरणार आहे. तो खेळाडू म्हणजेच एडेन मार्करम (Aiden Markram) आहे. मार्करम हा हैदराबादचे नेतृत्व करणारा नववा खेळाडू ठरेल. पहिल्या सामन्यात मार्करमच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने केले होते. (Sunrisers Hyderabad have won the toss and have opted to bat know playing xi here)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
लखनऊ सुपर जायंट्स
केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई
सनरायझर्स हैदराबाद
मयंक अगरवाल, अनमोलप्रीत सिंग (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, आदिल रशीद
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू तडकाफडकी मायदेशी रवाना! जाणून घ्या कारण
मुंबई इंडियन्सपेक्षाही जास्त ‘ही’ टीम उधळते चीअरलीडर्सवर पैसा, दुसऱ्या स्थानावर RCB