---Advertisement---

मार्करमऐवजी भुवीने उधळला टॉस, राजस्थान करणार पहिली बॅटिंग; महत्त्वाचा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

On: रविवार, एप्रिल 2, 2023 3:14 PM
SRH-vs-RR
---Advertisement---

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या महासंग्रामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील 3 सामने आतापर्यंत पार पडले आहेत. आता स्पर्धेचा चौथा सामना रविवारी (दि. 2 एप्रिल) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हैदराबाद येथे खेळला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात 7.30 वाजता पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी उभय संघात 7 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक हैदराबादने संघाने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकत उभय संघ स्पर्धेत विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ या सामन्यात फजलहक फारुकी, हॅरी ब्रूक, आदिल रशीद आणि ग्लेन फिलिप्स या चार विदेशी खेळाडूंसोबत उतरणार आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन (Sanju Samson) संघ जोस बटलर, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट आणि शिमरॉन हेटमायर या चार विदेशी खेळाडूंसोबत मैदानात उतरणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1642461468754071553

हैदराबाद संघ आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत नवीन कर्णधारासह उतरणार आहे. त्यांनी कर्णधारपदाची जबाबदारी दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक खेळाडू एडेन मार्करम (Aiden Markram) याच्याकडे सोपवली आहे. मात्र, या सामन्याचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्याकडे आहे. तसेच, राजस्थान रॉयल्स संघाची धुरा याच्याकडे आहे. या दोन्ही कर्णधारांचा आपल्या संघाला विजयी सुरुवात करून देण्याचा मानस असेल. (Sunrisers Hyderabad have won the toss and have opted to field IPL 2023)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद
मयंक अगरवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स (यष्टीरक्षक), उमरान मलिक, आदिल रशीद, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), टी नटराजन, फजलहक फारुकी

राजस्थान रॉयल्स
यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
हे माहितीये का? 2011 वर्ल्डकप फायमलमध्ये दोन वेळा झालेला टाॅस? संगकारा ठरलेला व्हिलन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---