आयपीएल 2023 साठीचा मिनी लिलाव कोची येथे झाला. प्रत्येक फ्रॅंचायजी या लिलावात आपल्या संघातील रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. प्रथमच आयपीएल लिलावाचा भाग झालेला इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने पहिल्याच लिलावात नवा विक्रम प्रस्थापित केला. दीड कोटींची आधारभूत किंमत असलेल्या ब्रुकला तब्बल 13.25 कोटी रुपये देत सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात सामील केले.
What do you make of this buy folks? 💰💰
Congratulations to Harry Brook who joins @SunRisers #IPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/iNSKtYuk2C
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
मागील वर्षभरापासून इंग्लंडच्या कसोटी व टी20 संघांमध्ये ब्रुक याने स्थान मिळवले होते. विश्वचषक विजेता इंग्लंड संघात देखील त्याची महत्त्वाची भूमिका राहिलेली. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यात कसोटी मालिकेत त्याने तीन शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले. त्यामुळे या लिलावात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जाण्याची शक्यता होती.
केवळ दीड कोटी रुपयांपासून सुरू झालेली त्याची बोली हळूहळू वाढत गेली. सुरुवातीला राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी या 23 वर्षाच्या फलंदाजावर बोली लावण्यास सुरुवात केली. मात्र, 5 कोटीनंतर बंगलोरने माघार घेतली. मात्र, त्यानंतर राजस्थानला झुंज देण्यासाठी सनरायझर्स हैदराबादने पाऊल ठेवले. अत्यंत वेगवान झालेल्या या बोलीत अखेर सनरायझर्सने राजस्थानला पछाडत 13.25 कोटींचं त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
ब्रुक याने इंग्लंडसाठी आतापर्यंत केव्हा चार कसोटी व 20 टी20 सामने खेळले आहेत. त्याच्या एकूण टी20 कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 99 सामन्यात 148 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत.
(Sunrisers Hyderabad Spend 13.25 Crore For Harry Brook In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: रिषभ पंतने रनआऊट होण्यापासून वाचवले, तरी विराट भडकला; रिऍक्शन व्हायरल
BANvIND: दुसऱ्या दिवशीच्या सुरूवातीलाच भारताला दोन धक्के, राहुल-गिल स्वस्तात ‘आऊट’