मुंबई | आज आयपीएल २०१८च्या प्ले-आॅफला सुरुवात होत आहे. प्ले-आॅफमधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामना आज मुंबईमधील शेषराव वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्याला प्ले-आॅफमध्ये क्वाॅलिफायर-१ असे म्हटले जाते.
यात जो संघ जिंकणार आहे तो थेट अंतिम सामन्याला पात्र ठरणार आहे. तर पराभूत संघाला क्वालिफायर-२ मध्ये पुन्हा खेळण्याची संधी मिळणार आहे.
एलिमिनेटर-१ सामना २३ मे रोजी कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होत आहे. यांच्यात जो संघ विजय मिळवेल तो आज पराभूत होणाऱ्या संघासोबत २५ मे रोजी क्वालिफायर-२चा सामना खेळणार आहे.
यामुळे आज पराभूत होणाऱ्या संघाच्या चाहत्यांनी विशेष नाराज होण्याची गरज नाही.
11 आयपीएल मोसमात पहिल्यांदाच असे घडले की प्ले-आॅफला पात्र ठरलेले चारही संघांनी किमान एकदा तरी आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.
यावर्षी सनरायझर्स हैद्राबाद, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ प्ले-आॅफला पात्र ठरले आहेत.
यातील सनरायझर्स हैद्राबादने 2016ला आणि राजस्थान रॉयल्सने 2008ला असे एकदा, तर चेन्नई सुपर किंग्जने 2010, 2011 आणि कोलकता नाईट रायडर्सने 2012, 2014 असे दोनदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
आयपीएल 2018च्या प्ले-आॅफचे सामने मंगळवार, 22 मे अर्थात आजपासून सुरू होत आहे.
असे होतील आयपीएल 2018च्या प्ले-आॅफचे सामने:
22 मे: क्वालिफायर 1 – सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
23 मे: एलिमिनेटर – कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
25 मे: क्वालिफायर 2 – क्वालिफायर 1 चा पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरचा विजयी संघ
27 मे: अंतिम सामना – क्वालिफायर 1चा विजयी संघ विरुद्ध क्वालिफायर 2चा विजयी संघ
महत्त्वाच्या बातम्या-
–जर्सी भारताची असो की चेन्नईची, धोनी विक्रम करताना काही थांबेना!
–तब्बल ११ आयपीएल वाट पहावे लागले आणि अखेर काल तो विक्रम घडलाच!
–व्हिडिओ व्हायरल- मुंबई हारली, पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा खुष
–कोण आहे रोहित शर्मा? शेजारी बसलेल्या प्रवाशाने रोहितला पाहताच काय केले पहा?
–रैनाच आहे आयपीएल विक्रमांचा बादशाह, रोहितचा विक्रम दोन दिवसात मोडला