---Advertisement---

मेगा लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या या 3 खेळाडूंवर टांगती तलवार, संघ रिटेन करणार का?

Sunrisers-Hyderabad
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या तयारीला लवकरच सुरुवात होणार आहे. आगामी आयपीएलमध्ये अनेक संघात बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचे आयोजन होणार आहे. त्यामुळे सर्व संघ लवकरच आपली रिटेन खेळाडूंची लिस्ट प्रसिद्ध करतील. जर सनरायजर्स हैदराबद संघाचे बोलायचे झाल्यास या तीन खेळाडूंवर सध्या धोका निर्माण होत आहे. कारण संघ या तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकते. हैदराबाद मयंक आग्रवाल, राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करमला सोडू शकते.

हैदराबादने मयंक अग्रवालला 2023 मध्ये 8.25 कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्याआधी तो पंजाब किंग्जचा भाग होता. मयंकने मागील हंगामात केवळ 4 सामने खेळला ज्यामध्ये त्याने 64 धावा केल्या. त्याआधी 2023 मध्ये पंजाबकडून खेळताना त्याने 10 सामन्यात 270 धावा केल्या होत्या. पण हैदराबाद यावेळी मयंकची साथ सोडण्याची शक्यता आहे. संघ मेगा लिलावामध्ये मयंकच्या जागी मोठ्या खेळाडूच्या मागे लागू शकते.

मार्करामला हैदराबादमधून बाद केले जाऊ शकते. मेगा लिलावापूर्वी संघ त्याला सोडू शकतो. मार्करमने गेल्या मोसमात 11 सामन्यात 220 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने एक अर्धशतक ठोकले. मार्करमने 2023 मध्ये 13 सामन्यात 248 धावा केल्या होत्या. पण आता हैदराबाद त्याला सोडू शकते. मार्करामला 2022 मध्ये हैदराबादने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

राहुल त्रिपाठीने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याची चांगली कामगिरी आयपीएलमध्येही पाहायला मिळाली आहे. मात्र गेल्या मोसमात तो विशेष काही करू शकला नाही. राहुल त्रिपाठीने मागील मोसमात 6 सामन्यात 165 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने एक अर्धशतक केले. त्रिपाठीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 95 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 2236 धावा केल्या आहेत. त्रिपाठीने स्पर्धेत 12 अर्धशतके झळकावली आहेत. राहुलला 2022 मध्ये हैदराबादने 8.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्ससोबत होता.

हेही वाचा-

नीरज चोप्राची मोठी झेप, ब्रॅन्ड व्हॅल्यूच्या बाबतीत हार्दिक पांड्याला मागे टाकलं; आता नंबर रोहितचा!
सर्वोत्तम कामगिरी करूनही नीरज चोप्रा निराश! म्हणाला, ‘मी माझ्या थ्रोमुळे…’
नीरज चोप्राने अवघ्या 14 दिवसांतच मोडला ऑलिम्पिक विक्रम, केला हंगामातील सर्वोत्तम थ्रो!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---