रविवारी (दि. १७ एप्रिल) आयपीएल २०२२चा पहिला डबल हेडर सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेल्या आयपीएलच्या २८व्या सामन्यात हैदराबाद संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा या हंगामातील सलग चौथा विजय होता. हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार उमरान मलिक ठरला. मलिकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत पंजाब संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी मयंक अगरवालच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार बनलेल्या शिखर धवनच्या पंजाब संघाने निर्धारित २० षटकात सर्वबाद १५१ धावा केल्या आणि हैदराबादला १५२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादने १८.५ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले आणि विजय मिळवला.
AIDEN FINISHES OFF IN STYLE AGAIN! THE #RISERS WIN! 🧡🧡🧡 #PBKSvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 17, 2022
हैदराबाद संघाचा डाव
हैदराबादकडून फलंदाजी करताना एडन मार्करमने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने २७ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा केल्या. त्याच्यासोबतच निकोलस पूरननेही नाबाद राहत ३० चेंडूत ३५ धावा चोपल्या. यामध्ये १ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त राहुल त्रिपाठीने ३४, तर अभिषेक शर्माने ३१ धावांचे योगदान दिले. कर्णधार केन विलियम्सनने यावेळी फक्त ३ धावा केल्या. मात्र, त्याचा फारसा परिणाम संघावर झाला नाही. मार्करम आणि पूरनच्या खेळीमुळे संघाला सहजरीत्या विजय मिळाला.
That's that from Match 28.
Aiden Markram finishes off things in style as @SunRisers win by 7 wickets.#TATAIPL #PBKSvSRH pic.twitter.com/njYoptmhFw
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना राहुल चाहरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २८ धावा देत २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, कागिसो रबाडानेही १ विकेट घेतली.
लिविंगस्टोनची खेळी निरर्थक
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून लियाम लिविंगस्टोनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ३३ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६० धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकट्या शाहरुख खानलाच २६ धावा करता आल्या. बाकीच्या कोणत्याही खेळाडूला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. प्रभारी कर्णधार शिखर धवनने फक्त ८ धावा केल्या. विशेष म्हणजे, ओडियन स्मिथ राहुल चाहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग यांना भोपळाही फोडता आला नाही. यावेळी लिविंगस्टोनची वादळी खेळी निरर्थक ठरली. त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना उमरान मलिकने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. या चार विकेट्स ओडियन स्मिथ राहुल चाहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंच्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमारही उजवा ठरला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच, टी नटराजन आणि जगदीश सुचिथ यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
या विजयासह हैदराबाद संघ गुणतालिकेत ४ विजयासह चौथ्या स्थानी पोहोचला आहे. त्यांचे ८ गुण आहेत. दुसरीकडे, पंजाब संघ तिसऱ्या पराभवासह सातव्या स्थानी पोहोचला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अरे कमीत कमी आयपीएल कर्णधारपदाचा तरी राजीनामा दे’, मुंबईच्या सलग ६ पराभवानंतर रोहितवर भडकले चाहते
बेंगलोरविरुद्धचे ‘ते’ षटक दिल्ली कॅपिटल्सला पडले महागात; खुद्द कर्णधाराचा खुलासा
ग्राउंड्समनच्या मुलाला जेव्हा धोनीने दिला मोलाचा सल्ला, ‘ऑफ स्पिनर्सला टी२० मध्ये सर्वच मारतात, पण…’