टी20 विश्वचषक 2024 चा खरा थरार काही तासांनंतर पाहायला मिळणार आहे. कारण आजपासून (19 जून) सुपर-8 फेरीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या 20 संघांपैकी 8 संघ या सुपर-8 टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. बुधवारी रात्री 8 वाजता दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका यांच्यात सुपर-8 चा पहिला सामना रंगणार आहे. कागदावर कमकुवत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या संघाने पाकिस्तान आणि कॅनडाचा पराभव करुन सुपर-8 मध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिका यूएसएला कमी आखण्याची चूक करणार नाही.
पाकिस्तान आणि कॅनडाचा पराभव केल्यानंतर अटी तटीच्या सामन्यात भारताने अमेरिकेचा पराभव केला. त्यामुळे कागदावर दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका यांच्यातील स्पर्धा तुल्यबळ वाटत नसली, तरी क्रिकेटप्रेमींमध्ये त्याबद्दल पूर्ण उत्सुकता आहे. टी20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीत अमेरिकेने धडक मारली आहे, तर दक्षिण आफ्रिकाही या विश्वचषकात उल्लेकनीय कामगिरी करण्यात अद्याप यशस्वी ठरली नाही. नवख्या नेपालविरुद्ध केवळ 1 धावाने दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला होता. तर बांग्लादेश समोर 4 धावांनी विजय मिळवता आला. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सुपर-8 मध्ये 8 संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. पहिल्या गटात भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका व्यतिरिक्त यजमान वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दुसऱ्या गटात आहेत. सुपर-8 मधील 8 संघांपैकी 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील
सुपर-8 फेरीत भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. भारत-अफगाणिस्तान सामना 20 जून रोजी ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे होणार आहे. ब्रिजटाऊनची खेळपट्टी अमेरिकन खेळपट्ट्यांपेक्षा वेगळी आणि चांगली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने ब्रिजटाऊनमध्ये इंग्लंडविरुद्ध 201 धावा केल्या होत्या.
महत्तवाच्या बातम्या-
विराट कोहलीच्या फाॅर्मबद्दल भारताच्या माजी खेळाडूचं वक्तव्य! दिलं रोहितचं उदाहरण
सूर्यकुमार यादव इतिहास रचण्याच्या जवळ, असं करताच मोडेल धोनी अन् कार्तिकचा विक्रम
मार्कस स्टॉइनिस टी20 अष्टपैलू रँकिंगमध्ये अव्वल स्थानी, आश्चर्यकारक! टाॅप-5 मध्ये एकही भारतीय नाही