दुबई। 14 व्या एशिया कप स्पर्धेत आज(21 सप्टेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुपर फोर फेरीतील सामना होणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच या सामन्यासाठी भारतीय संघात अष्टपैलू रविंद्र जडेजाचे पुनरागमन झाले आहे. मागील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या दुखापत ग्रस्त झाला असल्याने त्याला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी 11 जणांच्या भारतीय संघात जडेजाला स्थान मिळाले आहे.
जडेजाने भारताकडून शेवटचा वनडे सामना विंडिज विरुद्ध 6 जून 2017 ला खेळला होता. त्यानंतर तो आज 1 वर्षानंतर भारताकडून वनडे सामना खेळणार आहे.
तर बांगलादेशच्या 11 जणांच्या संघात मुस्तफिझुर रेहमान, मुशफिकुर रहिम यांचे पुनरागमन झाले आहे.
या सामन्याआधी भारतीय संघाने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकत सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. तर बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला तर अफगाणिस्तानविरुद्ध पराभव स्विकारला आहे.
भारत आणि बांगलादेश आत्तापर्यंत 33 वेळा वनडेत आमने सामने आले असून भारताने यात 27 वेळा बाजी मारली आहे, तर बांगलादेशने 5 वेळा विजय मिळवला आहे. तसेच 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
याबरोबरच एशिया कपस्पर्धेत हो दोन संघ आत्तापर्यंत 10 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यात भारताने 9 वेळा तर बांगलादेशने 1 वेळा विजय मिळवला आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.
#AsiaCup– बांग्लादेशविरुद्ध अशी आहे टीम इंडिया- रोहित, शिखर, रायडू, केदार, धोनी, कार्तिक, कुलदीप, चहल, जडेजा, भुवी, बुमराह
भारतीय संघात केवळ एक बदल. जखमी हार्दिक पंड्याच्या जागी रविंद्र जडेजाला संधी #म #मराठी #AsiaCup18 #AsiaCup2018— Maha Sports (@Maha_Sports) September 21, 2018
बांगलादेश: मशर्रफ मोर्ताझा (कर्णधार), लिटन दास, नाझमुल हुसेन शान्तो, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, मोहम्मद मिथुन, महमदुल्ला, मोसद्दीक हुसेन, मेहदी हसन, रुबेल हुसेन, मुस्तफिजुर रहमान.
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीसाठी आजचा दिवस खास, बांगलादेशविरुद्ध होऊ शकतो विक्रमांचा विक्रम
–या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल
–धोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव