आजपर्यंत आपण सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला, हे वाक्य अनेकवेळा ऐकले असेल. परंतु सामना बरोबरीत सुटला आणि आणि दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला, हे वाक्य आपण पहिल्यांदाच ऐकले असेल. रविवारी (१८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात झालेल्या आयपीएलच्या ३६ व्या सामन्याचा निकाल दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये लागला.
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सामन्याचा निकाल काढण्यासाठी दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवावी लागली होती. सोबतच खेळाडूंमध्येही नियमांबाबत काहीतरी गोंधळ उडाला होता. चला तर मग सुपर ओव्हरबाबत आयसीसीचे नियम नेमकं काय सांगतात ते पाहुया…
नियम कोणते आहेत?
१. आयसीसीच्या नवीन नियमानुसार, जर सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला, तर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सामना खेळवला जाईल.
२. सामान्य परिस्थितीत पुढची सुपर ओव्हर सुरू होण्यामध्ये ५ मिनिटांपेक्षा अधिक वेळेचा ब्रेक नसला पाहिजे.
३. आधीच्या सुपर ओव्हरमध्ये ज्या संघाने नंतर फलंदाजी केली होती, तोच संघ पुढील सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करेल.
४. सुपर ओव्हरसाठी संघांनी जो चेंडू निवडला होता, त्याच चेंडूने पुढील सुपर ओव्हर टाकली जाईल.
५. क्षेत्ररक्षण करणारा संघ पुढील सुपर ओव्हर त्या बाजूने टाकू शकत नाही. ज्या बाजूने त्यांनी आधीची सुपर ओव्हर टाकली होती. म्हणजेच पुढील सुपर ओव्हर दुसऱ्या बाजून टाकली जाईल.
६. मागील सुपर ओव्हरमध्ये जो फलंदाज बाद झाला आहे, तो पुढील सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी येऊ शकत नाही.
७. सर्व खेळण्याच्या अटी पूर्वीच्या सुपर ओव्हरप्रमाणेच राहतील.
८. जिथे टाळता येण्यासारखी परिस्थिती नसते, त्यावेळी अमर्यादित सुपर ओव्हर्स, जसे की डबल हेडर इत्यादी होऊ शकत नाहीत. मालिका सुरू होण्यापूर्वी देशांतर्गत बोर्ड सहभागी संघांना संभाव्य मर्यादित षटकांची संख्या सांगेल.
असा होता सामना
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघानेही ६ विकेट्स गमावत १७६ धावाच केल्या. यानंतर मुंबईकडून सुपर ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सुपर ओव्हरमध्ये केवळ ५ धावा दिल्या. त्यानंतर पंजाबकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जबरदस्त गोलंदाजी करताना रोहित आणि क्विंटन डी कॉकला ५ धावांवरच रोखले.
यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाकडून ख्रिस गेल आणि मयंक अगरवालने फटकेबाजी करत १५ धावा कुटल्या आणि हंगामातील दुसरा विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
-सुपर ओव्हर पे सुपर ओव्हर! एकाच दिवसात ३ सुपर ओव्हर झाल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पडला पाऊस
-ड्रामा सुपर ओव्हरचा! आरसीबीचा मुंबई इंडियन्सला धक्का
-सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच ठरली सुपर, मयंकच्या जबरदस्त खेळीवर फेरले पाणी
-सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-सुपर ओव्हर टाकायचीये? पाहा प्रत्येक संघातील ‘अशा’ खास खेळाडूंची नावे
-मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या