दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध चमकदार खेळ केला. दिल्ली कॅपिटल्सच्या या आक्रमक सलामीवीर सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर तुटून पडला होता. जॉस हेजलवूडपासून दीपक चहरपर्यंत पृथ्वी शॉने कोणालाही सोडले नाही आणि शानदार अर्धशतक झळकावले. त्याने डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाचा बळी ठरण्यापूर्वी ३४ चेंडूत ६० धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉने त्याच्या शानदार खेळीदरम्यान चार षटकार ठोकले. त्याचवेळी शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर त्याने मारलेला एक फटका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरला.
शार्दुल ठाकूर पाचव्या षटकाचा पहिला चेंडू टाकत होता. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर लेन्थ बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि पृथ्वी शॉचे क्षणार्धात मोठा फटका मारला आणि चेंडू थेट डीप मिड-विकेटच्या दिशेने सीमापार गेला. चेंडू कोणत्याही क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर असताना, एका प्रेक्षकाने स्टँडमध्ये सुरेख झेल पकडला. कोविड -१९ प्रोटोकॉलमुळे या चाहत्याने चेहऱ्यावर मास्क घातला होता. फॅन त्याच्या डावीकडे थोडा सरकला आणि रिव्हर्स-कप पद्धत वापरून उत्कृष्ट झेल घेतला.
हा चाहता त्याच्या प्रयत्नांमुळे खूप आनंदी दिसत होता आणि ते त्याच्या आनंद व्यक्त करण्याच्या शैलीतून स्पष्टपणे दिसून येत होते. सामन्याच्या समालोचकानेही या चाहत्याचे खूप कौतुक केले. या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि क्रिकेट चाहतेही व्हिडिओला खूप पसंती देत आहेत.
https://twitter.com/CowCorner9/status/1447219656314408971
दरम्यान, पृथ्वी शॉचे या हंगामातील पहिलेच अर्धशतक झळकावले आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा युवा सलामीवीर वगळता रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांनी चांगली खेळी केली. पंतने नाबाग ५१ धावांची खेळी केली आणि शिमरॉन हेटमायरने ३७ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीने २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या होत्या. मात्र चेन्नईने हे आव्हान १९.४ षटकात पूर्ण केले आणि सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
“जेव्हा धोनी खेळपट्टीवर येतो, तेव्हा आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो”, सीएसके प्रशिक्षकांचे भाष्य
सीएसकेची जोडी जबरदस्त! फाफ-ऋतुराजकडे वर्षातील सर्वोत्तम सलामीवीर बनण्याची संधी
टी२० विश्वचषकात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू करतायेत कसून तयारी, पाहा फोटो





