इंडिजन प्रीमियर लीग 2023च्या लीग स्टेजचे शेवटचे दोन सामने रविवारी खेळले जात आहेत. प्लेऑफच्या चार जागापैकी तीन जाका संघांनी पक्क्या केल्या आहेत. राहिलेल्या एका जागेसाटी तीन संघ स्पर्धेत आहेत. राजस्थान रॉयल्सने लीग स्टेजचे सर्व सामने खेळले असून 14 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचा आफला शेवटचा सामना गमावला, तर राजस्थानला प्लेऑफमध्ये संधी मिळू शकते. याच पार्श्वभूमीवर रविचंद्रन अश्विन याने एक पोस्ट शेअर केली, जी चांगलीच व्हायरल होत आहे.
आयपीएल 2023ची गुणतालिका आणि प्लेऑफसाठीचे गणित पाहून रविचंद्रन अश्विन ( Ravichandran Ashwin) याने ही मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत राजस्थान रॉयल्सचे खेळाडू मैदानात चर्चा करत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये अश्विनने लिहिले की, “जेव्हा आपण सर्वांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की, गुजराती जेवण आपल्याला आवडते आणि तेलूगू आजच्या दिवसासाठी आमच्या संघाची अधिकृत भाषा बनते.”
When you are trying to tell everyone that Gujarati food should be our favourite and Telugu should become our teams official language for today.😂😂 @rajasthanroyals #HallaBolkonjamnallabol #AavaDe #orangearmy pic.twitter.com/T9K3fMA4a7
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) May 21, 2023
दरम्यान, राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचणार की नाही, हे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या प्रदर्शनावर ठरणार आहे. रविवारच्या (21 मे) डबल हेडरचा पहिला सामना मुंबई विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा आहे, तर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स आमने सामने आहेत. रविवारचे सामने खेळले जाण्याआधी मुंभई, आरसीबी आणि राजस्थानकडे प्रत्येकी 14-14 गुण होते. मात्र, फरक फक्त इतकाच आहे की, राजस्थानने आपले सर्व सामने खेळले आहेत. तर दुसरीकडे मुंभई आणि आरसीबीला आपला शेवटचा सामना खेळायचा आहे. जर या दोन्हीपैकी एक जरी संघ जिंकला, तर राजस्थान प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार नाही.
याच कारणास्तव राजस्थानचा संपूर्ण संघ अशीच अपेक्षा करत असणार की, रविवारच्या सामन्यात गुजरात आणि हैदराबाद संघ जिंकतील. अश्विनने कुठलाच विचार न करता आपल्या सोशल मीडिया खात्यावरून हैदराबाद आणि गुजरातच्या समर्थनार्थ ही पोस्ट शेअर केली. (Support Hyderabad and Gujarat! Ravichandran Ashwin’s funny advice to colleagues)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हा नशिबाचा खेळ! खराब फॉर्ममधील रोहितची पाठराखन करण्यासाठी पुढे आले रवी शास्त्री
धोनीच्या आयपीएल निवृत्तीवर ऋतुराज गायकवाडचा मोठा गौप्यस्फोट, काय म्हणाला वाचाच