इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान मँचेस्टर येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र, दुसरा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा याने क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. त्याच्या दोन जबरदस्त झेलानंतर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी गौरवशाली शब्दांचा वापर केला.
जडेजाने टिपले दोन महत्वपूर्ण झेल
खराब सुरुवातीनंतर इंग्लंडला बेन स्टोक्स व जेसन रॉय यांनी सावरण्याचे काम केले. मात्र, हार्दिक पंड्याने दोघांना दोन षटकात बाद करत भारताला पुनरागमन करण्याची संधी दिली. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने अप्रतिम अर्धशतक झळकावले. त्याला लियाम लिव्हिंगस्टोनने चांगली साथ दिली. परंतु हार्दिक पंड्याने आपल्या दुसऱ्या पॅनमध्ये आल्यावर या दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडच्या डावातील ३७ वे षटक टाकत असताना त्याने पहिल्यांदा लिव्हिंगस्टोनला तर बटलरला रवींद्र जडेजाकरवी झेलबाद केले. जडेजाने अप्रतिमत्ता हे दोन्ही झेल पकडले.
https://twitter.com/imShrey1817/status/1548654893472178177?t=9TH2FbAgMv0AHHL7MWFKkg&s=19
भोगले यांनी केले कौतुक
जडेजाने दोन्ही झेल सीमारेषाजवळ पकडले. लिव्हिंगस्टोनचा झेल पकडताना त्याने आपल्या तंदुरुस्तीचे योग्य प्रमाण देत उडी मारत झेल टिपला. तर, बटलरचा झेल पकडताना तो डाव्या बाजूला पंधरा मीटर धावत आला व तो झेल पूर्ण केला. या दोन झेलांनंतर समालोचन करत असलेल्या हर्षा भोगले यांनी म्हटले,
Two stunning catches in the deep by @imjadeja 🔥🔥
Definitely one of the best fielders in the world.#TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/qs5bqdGPjc
— BCCI (@BCCI) July 17, 2022
“पाहा हा मॉडर्न डे क्रिकेटमधील सर्वोत्तम ऍथलिट”
सध्या जडेजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये गिनती होते. त्याच्या झेलांनंतर क्रिकेट चाहते व संपूर्ण क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बीसीसीआय व आयपीएलच्या सर्व संघांनी ट्विट करत त्याचे कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान ३१ जुलैला येणार आमने-सामने, वाचा कधी आणि कुठे रंगणार सामना
शेवटच्या निर्णायक वनडे सामन्यात नशीब भारताच्या बाजूने, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय
तू चुकतोय; कर्णधार रोहित शर्माच्या ‘या’ निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटरने मुरडले नाक