भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सोमवारी (१४ मार्च) संपला. भारताने या सामन्यात २३८ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत श्रीलंका संघाला क्लीन स्वीप (२-०) दिला. श्रीलंका संघासाठी भारताचा हा दौरा निराशाजनक राहिला, सोबतच त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल याने संघाची साध सोडली. लकमलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय खेळाडूंकडून त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.
श्रीलंकान दिग्गज सुरंगा लकमल (Suranga Lakmal) याने काउंटी संघ डबीर्शायरसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता तो इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. परंतु, श्रीलंकन संघाच्या जर्सीमध्ये तो यापुढे कधीच दिसणार नाही. सोमवारी लकमल जेव्हा पव्हेलियमध्ये परतला, ती त्याची शेवटीच वेळ होती. भारतीय खेळाडूंनी त्याला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयने या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओत दिसते की, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वप्रथम त्याची भेट घेऊन त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. लकमल एक असा खेळाडू होता, ज्याचा श्रीलंकन क्रिकेटमध्ये कधीच विसर पडू शकत नाही.
Spirit of Cricket at its best as #TeamIndia congratulate Suranga Lakmal who played his last international match 🤜🤛 #SpiritOfCricket | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/aa17CK5hqv
— BCCI (@BCCI) March 14, 2022
श्रीलका संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने त्यांच्या संघाचा महत्वाचा खेळाडू आणि अनुभवी लकमलला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. करुणारत्ने म्हणाला की, “मी माझ्या कारकिर्दीत सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक पाहिला आहे. मी त्याच्यासाठी खूप खुश आहे की, तो आता काउंटी क्रिकेट खेळायला जाणार आहे आणि मला माहीत आहे की, तो त्याठिकाणीही चांगले प्रदर्शन करेल. मी त्याला आगामी काउंटी हंगामासाठी शुभेच्छा देतो.”
Suranga Lakmal ends his International career with 2️⃣8️⃣7️⃣ wickets! 🙌#ThankYouLakmal It's been an incredible career.🎉️https://t.co/VSJlrTssgn
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 14, 2022
दरम्यान, श्रीलंका क्रिकेटमध्ये लकमलचे योगदान लक्ष्यात घेतले, तर ते खूप मोठे आहे. त्याने श्रीलंका संघासाठी ७० कसोटी सामने खेळले आणि यामध्ये १७१ विकेट्स घेतल्या. तो श्रीलंका संघाच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक होता.
महत्वाच्या बातम्या –
कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानावर धावलेल्या फॅन्सबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी केलीये कडक कारवाई
विषय गंभीर, कॅप्टन रोहित खंबीर! प्रतिस्पर्ध्यांना व्हाईट वॉशचा दणका देत रचलेत विक्रमांचे मनोरे, वाचा