भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंमध्ये गणले जाते. त्याने आतापर्यंत बऱ्याचदा त्याच्या प्रदर्शनातून याचा प्रत्यय दिला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात रविवारी (०६ मार्च) मोहाली येथे २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (First Test) पार पडला. हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या सामना विजयात जडेजाचे मोठे योगदान राहिले. त्याला या सामन्यातील त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यातही आले. या सामन्यादरम्यान जडेजाने एक अनोखा विक्रमही (Ravindra Jadeja Record) केला आहे.
जडेजाने या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (०६ मार्च) आपल्या गोलंदाजीने अशी काही कमाल करून दाखवली आहे, जी त्याच्यापूर्वी भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणताही गोलंदाज करू शकलेला नाही.
हेही वाचा- जड्डू ऑन फायर! एकाच कसोटीत दीडशेपेक्षा जास्त धावा आणि ९ विकेट्स घेणारा बनला देशातील पहिलाच खेळाडू
जडेजाने एकाच फलंदाजाला केले २ वेळा बाद
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ १७४ धावांवर गारद झाला. या डावादरम्यान जडेजाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याने श्रीलंकेच्या पहिल्या डावात १३ षटके गोलंदाजी करताना केवळ ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावातही त्याचे शानदार गोलंदाजी प्रदर्शन सुरूच राहिले. या डावात त्याने श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले. १६ षटके गोलंदाजी करताना ४६ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे संपूर्ण सामन्यात जडेजाने ८७ धावांवर ९ विकेट्स घेण्याची विलक्षण कामगिरी केली.
यादरम्यान त्याच्या श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ५ विकेट्समध्ये सुरंगा लकमल (Suranga Lakmal) याच्या विकेटचाही समावेश होता. त्याने शून्य धावांवर लकमलला बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने लकमलला शून्य धावांवर आपला शिकार बनवले. विशेष म्हणजे, जडेजाने लकमलला दोन्ही डावात बाद करण्याचा पराक्रम (Jadeja Dismissed Lakmal Twice On Same Day)एकाच दिवशी म्हणजे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी घेतल्या. यासह जडेजा भारताकडून कसोटी सामन्याच्या एकाच दिवशी विरोधी संघाच्या कोणत्या खेळाडूला २ वेळा बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्याच्या एकाच दिवशी एकाच फलंदाजाला २ वेळा बाद करणारे गोलंदाज (Batsman Dismissed for a pair by the same bowler on the same day)
१. सी टर्नर (बाबी पिल, सिडनी, १९८५)
२. टीजे मैथ्यूज (टी वार्ड, मॅनचेस्टर, १९९१)
३. एफ ट्रूमैन (पंकज रॉय, मॅनचेस्टर, १९५२)
४. जिम लेकर (एन हार्वे, मॅनचेस्टर, १९५६)
५. रविंद्र जडेजा (सुरंगा लकमल, मोहाली, २०२२)
महत्त्वाच्या बातम्या-
अक्षर पटेल फिटनेस अपडेट – श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत करू शकतो कमबॅक
मॅच विनिंग प्रदर्शन करूनही रविंद्र जडेजाने स्वत:ला दिलं नाही श्रेय; म्हणाला, ‘टीम वर्क गरजेचं आहे’
झूलन गोस्वामीने पाकिस्तानी फलंदाजाला केले ‘सरप्राईज’, कंफ्यूजनमध्ये झाली बाद; पाहा Video