मॅच विनिंग प्रदर्शन करूनही रविंद्र जडेजाने स्वत:ला दिलं नाही श्रेय; म्हणाला, ‘टीम वर्क गरजेचं आहे’

मॅच विनिंग प्रदर्शन करूनही रविंद्र जडेजाने स्वत:ला दिलं नाही श्रेय; म्हणाला, 'टीम वर्क गरजेचं आहे'

भारत आणि श्रीलंका यांच्यात मोहालीमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नाबाद १७५ धावा केल्या. जडेजाच्या या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ८ विकेट्सच्या नुकसानावर ५७४ धावा केल्या आणि डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका संघाने चार विकेट्स गमावल्या आणि १०८ धावा केल्या. यानंतर रविंद्र जडेजाने महत्वाची प्रतिक्रिया दिली.

श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याची विकेटही जडेजानेच घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) म्हणाला की, “खरोखर चांगले वाटत आहे. काल रिषभ (पंत) खरच चांगला खेळत होता. तो गोलंदाजांवर आक्रमण करत होता. त्यामुळी मी फक्त नॉन स्ट्राइक एंडवर थांबून त्याच्या फलंदाजीचा आनंद घेत होतो. मी फक्त माझा वेळ घेत होतो. मी आणि रिषभ एक भागीदारी करण्याविषयी चर्चा करत होतो आणि ऍश (रविचंद्रन अश्विन) सोबतही अशीच चर्चा झाली होती.”

“मला त्याच्यासोबत (अश्विन) फलंदाजी करायला नेहमीच आवडते, त्याच्यासोबत गोलंदाजी करायलाही, या सगळ्या टीम वर्कच्या गोष्टी आहेत. एकटा खेळाडू तुम्हाला विजय मिळवून देऊ शकत नाही आणि यासाठी संघाने एकत्र प्रयत्न केले पाहिजेत. जसा-जसा सामना पुढे जाईल, खेळपट्टीवर अधिक टर्न मिळू शकतो आणि ऑड चेंडूही कमी होऊ शकतात. आम्ही विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू.” असे जडेजा पुढे बोलताना म्हणाला.

दरम्यान, भारत-श्रीलंका (Ind vs SL Test Series) यायंच्यात पहिल्या सामन्याच्या  पहिल्या डावात भारातने ५७४ धावा केल्यानंतर श्रीलंका संघा पहिल्या डावात अवघ्या १७४ धावांवर सर्वबाद झाला. जडेजाने फलंदाजीसह गोलंदाजीतही बहुमूल्य योगदान दिले. पहिल्या डावात जडेजाने श्रीलंका संघाच्या पाच विकेट्स घेतल्या. परिणामी पहिल्या डावात भारतीय संघाने तब्बल ४०० धावांची आघाडी घेतली आणि श्रीलंका संघाला फॉलो ऑन (पुन्हा फलंदाजी) दिला. श्रीलंका संघ दुसऱ्या डावातही १७८ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला.

महत्वाच्या बातम्या –

रविंद्र जडेजासोबत शेन वॉर्नचे नाते होते खूप खास, सीएसकेने शेअर केला जुना फोटो

अश्विन कसोटीतील महान भारतीय गोलंदाज बनण्याच्या वाटेवर, ४ विकेट्स घेत कपिल देवची केली बरोबरी

हरहुन्नरी जडेजा! मोहाली कसोटीत १७५ धावांनंतर ५ विकेट्स घेत तब्बल ६० वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.