---Advertisement---

नादच खुळा! कोहलीने दिलेले ‘बॅट बॅलेन्स चॅलेंज’ रैनाने केले मान्य; मग काय झालं पाहाच

On: मंगळवार, जुलै 6, 2021 10:19 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. मागील काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्काने ट्रेंड सुरू केला होता, ज्यामध्ये विराट आणि अनुष्काने एका व्हिडिओद्वारे अनेकांना चॅलेंज दिले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला.

विराट-अनुष्काने दिले वेगळे चॅलेंज
विराट कोहलीने अनुष्का शर्मा सोबत मिळून एक चॅलेंजचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की विराट आणि अनुष्का क्रिकेट बॅट एका हाताच्या बोटांवर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत होते. विरुष्काने या चॅलेंजला ‘बॅट बॅलन्स चॅलेंज’ असे नाव दिले. त्याच बरोबर आपल्या चाहत्यांना या चॅलेंजचा स्वीकार करण्यास सांगितले.

https://www.instagram.com/p/CQ0KmqvJ9PT/

रैनाने चॅलेंजचा केला स्वीकार
माजी भारतीय फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने विराट आणि अनुष्काने दिलेल्या बॅट बॅलन्स चॅलेंजचा स्वीकार केला. रैनाने हे चॅलेंज पूर्ण देखील केले आहे. त्याने चॅलेंज पूर्ण करण्याचा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, ‘एकदम टकाटक चॅलेंज आहे.’

सोशल मीडियावर रैना नेहमीच सक्रिय
विराट आणि अनुष्का यांच्याप्रमाणेच सुरेश रैना देखील सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. त्याचबरोबर रैना चाहत्यांसोबत आपल्या जीवनातील काही किस्से शेअर करतो. इंस्टाग्रामवर सुरेश रैनाचे जवळ जवळ 16.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मागील वर्षी निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर रैना फक्त इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसतो.

https://www.instagram.com/p/CQ8LeHDlPZy/

विराट आणि अनुष्का इंग्लंड दौऱ्यावर
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. हा संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहेत. या कसोटी सामन्याअगोदर भारतीय संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.

या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना काही दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. 14 जुलैला सर्व भारतीय खेळाडू एकत्र येतील आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करतीय. या इंग्लंड दौऱ्यादरम्यान बीसीसीआयने खेळाडूंना आपल्या कुटुंबालाही बरोबर नेण्याची परवानगी दिलेली असल्याने सध्या विराटची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका त्याच्यासह इंग्लंडमध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकात ‘या’ कारणामुळे पाहायला मिळतील कमी धावसंख्येचे सामने, माजी कर्णधाराचा अंदाज

“एमएस धोनी चेन्नईला सोडणार नाही, तो संघाचा महाराजा आहे”

अनुष्का शर्मा करणार स्पोर्ट्स बायोपिकमध्ये काम? ‘या’ महिला क्रिकेटपटूची भूमीका सारकरणार असल्याच्या चर्चेला उधाण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---