भारताचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना याने अखेर विदेशातील क्रिकेट लीग खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अबूधाबी T10 लीगच्या आगामी हंगामात खेळताना दिसेल. रैनाने टी10 लीगच्या पुढील हंगामासाठी डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाशी करार केला आहे. या संघाने गेल्या हंगामात विजेतेपद पटकावले होते. त्याचवेळी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने दिल्ली बुल्स संघाशी करार केला आहे.
रैना सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजेंड्सकडून खेळत आहे. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर या संघाचे नेतृत्व करतोय. त्याच वेळी हरभजन सिंग लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळत आहे. या लीगमध्ये तो मणिपाल टायगर्सचा कर्णधार आहे. आता हे दोन्ही भारतीय दिग्गज 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी10 लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत.
रैनाने अलीकडेच आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो विदेशी लीगमध्ये खेळण्याची शक्यता वाढली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा नियम केला आहे की, जर कोणत्याही भारतीय खेळाडूला परदेशी टी20 लीगमध्ये खेळायचे असेल तर, सर्वप्रथम त्याला भारताच्या स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घ्यावी लागेल.
रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या डावखुऱ्या फलंदाजाने भारतासाठी 226 वनडे सामन्यांमध्ये 5,615 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 5 शतके आणि 36 अर्धशतकेही केली होती. रैनाने 18 कसोटीत 768 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने 78 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 29.18 च्या सरासरीने 1,605 धावा केल्या. आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्याला मिस्टर आयपीएल म्हणून देखील ओळखले जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
T20 Word Cup 2022: स्पर्धेच्या काही दिवसांआधीच भारत ब्रिसबेनमध्ये ठोकणार तळ! जाणून घ्या कारण
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराहच्याजागी भारताच्या टी20 संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची एंट्री