टीम इंडिया टी20 विश्वचषक जिंकताच भारतीय संघाचे दोन शिलेदार विराट आणि रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाहीर केली. दरम्यान याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2024 नंतर टी20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतात. नेमकं तेच झालं. अंतिम सामन्यानंतर, दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीने चाहते खूप दुःखी आहेत. केवळ चाहतेच नाही तर टीम इंडियाच्या अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनीही या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर आपली निराशा व्यक्त केली आहे. भारताचा माजी स्टार अष्टपैलू सुरेश रैनाही दु:खी झाला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रैनाने बीसीसीआयकडे विशेष मागणी केली आहे. तो म्हणतो, “मी बीसीसीआयला विराट आणि रोहितसह जर्सी क्रमांक 18 आणि 45 निवृत्त करण्याची विनंती करतो.”
रैनाच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा तरुण खेळाडू हे जर्सी क्रमांक पाहतील तेव्हा त्यांना प्रेरणा मिळेल.” जर्सी क्रमांक 18 आणि 45 ने भारतीय संघाला अनेक महत्त्वाचे सामने जिंकण्यास मदत केली आहे. अशा परिस्थितीत ते जपले पाहिजेत जेणेकरून संघात येणाऱ्या युवा खेळाडूंना पाहून त्यांना प्रेरणा मिळेल.
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी अनुक्रमे 10 आणि 7 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरायचे. त्यांच्या निवृत्तीबरोबरच त्याचा जर्सी क्रमांकही निवृत्त झाला आहे. याचाच अर्थ आता कोणताही युवा क्रिकेटपटू इच्छित असला तरी 10 आणि 7 क्रमांकाची जर्सी वापरू शकत नाही. सध्या विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरतो आणि रोहित शर्मा देशाची 45 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरतो.
महत्तवाच्या बातम्या-
रोहितनं भर मैदानात असं काही सांगितलं, त्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये हार्दिकचं नाव दुमदुमलं
घरी देखील हिटमॅनचं जंगी स्वागत, या पध्दतीनं होती खास व्यवस्था
विजयी मिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठमोळ्या भाषेत प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ