भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने गेल्या वर्षी क्रिकेटला राम राम केले होते. तसेच हरभजन सिंगला भारतीय संघात स्थान मिळत नाहीये. परंतु, हे खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येत असतात. आता सध्या हे खेळाडू आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. दरम्यान सुरेश रैनाने (suresh raina) आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यावर हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स (Jonty Rhodes) यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत त्याची पायखेची केली आहे.
हरभजन सिंग, सुरेश रैना आणि जॉन्टी ऱ्होड्स हे सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतात. नुकताच सुरेश रैनाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो कारच्या खिडकी जवळ बसल्याचे दिसून येत आहे. हा फोटो जॉन्टी ऱ्होड्सने रीट्विट करत मजेशीर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर हरभजन सिंगने देखील आपली प्रतिक्रिया देत सुरेश रैनाची पायखेची करायला सुरुवात केली.
तर झाले असे की, सुरेश रैनाने अधिकृत सोशल ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो कारच्या खिडकीजवळ बसल्याचे दिसून येत आहे. तो प्रवासाचा आनंद घेताना दिसून येत आहे. हा फोटो जॉन्टी ऱ्होड्सने रीट्विट केला आणि लिहिले की, “माझी ट्रेनची सिट तुझ्या कारच्या सिटपेक्षा जास्त आरामदायी आहे.”
त्यानंतर हरभजन सिंगने देखील आपल्या कारचा फोटो शेअर करत दोन्ही दिग्गज खेळाडूंना टॅग करत लिहिले की, “माझी राइडही इतकी फालतू नाही.”
थोड्या वेळाने हरभजन सिंगने आणखी एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने त्याच्या आलिशान कारसोबतचे फोटो अपलोड केले आणि सुरेश रैना आणि जॉन्टी ऱ्होड्सला विचारले, “मी माझ्या घरी पोहोचलो आहे, तुम्ही दोघेही पोहोचलात का?”
✅☝️ #weekendvibes pic.twitter.com/wPUL1XosFV
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) December 18, 2021
My train seat looks more comfortable than your ride @ImRaina https://t.co/4Fip0N1PNt pic.twitter.com/jT3gp219W7
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) December 19, 2021
My ride isn’t that bad @JontyRhodes8 @ImRaina 👍👍 https://t.co/IUdkX8rEUK pic.twitter.com/KSLwTDVh47
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 19, 2021
I have reached Home @JontyRhodes8 @ImRaina have you ?? https://t.co/gaOR2bQ5Zd pic.twitter.com/hRC2F4nq0I
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 19, 2021
जॉंटी रोड्सने आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका बजावली. तर सुरेश रैनाने आयपीएल २०२१ स्पर्धेचे विजेते चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. हरभजन सिंग कोलकाता नाईट रायडर्स संघात होता.
महत्वाच्या बातम्या :
बीसीसीआयने विराटविरोधात आखले होते षडयंत्र? महत्वाची माहिती समोर
वेस्ट इंडिज क्रिकेटने घेतला मोठा निर्णय, निवड समीतीत होणार ‘हे’ फेरबदल