---Advertisement---

सुरेश रैना सीएसकेसाठी करतो हे खास काम, मोठ्या खेळाडूने केला खुलासा

On: रविवार, मार्च 29, 2020 2:14 PM
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेला फिरकीपटू गोलंदाज ब्रॅड हॉगने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या २ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा फलंदाज सुरेश रैनाचा समावेश आहे.

हॉगने (Brad Hogg) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणाला की, “या यादीत अव्वल क्रमांकावर वॉर्नर (David Warner) आहे. तो ऑफ साईडला वेगाने धावा करतो. तो एक व्यस्त असणारा फलंदाज आहे. वॉर्नर ठरावीक गोलंदाजांना निवडतो. तसेच स्ट्राईकमध्ये योग्य प्रकारे बदल करतो.”

“चेन्नईसाठी रैना (Suresh Raina) ज्या प्रकारे खेळतो ते पाहून मला चांगले वाटते. तो महत्त्वाच्या परिस्थितीमध्ये फलंदाजीला येतो आणि डाव पुढे घेऊन जातो,” असे रैनाबद्दल हॉग या व्हिडिओमध्ये म्हणाले.

आयपीएल २०२०चा (IPL 2020) १३ वा हंगाम कोरोना व्हायरसने (Corona Virus) भारतात शिरकाव केल्यामुळे १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. यापूर्वी आयपीएलची सुरुवात २९ मार्चला होणार होती.

सध्या भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. त्यामुळे आयपीएल होण्याची शक्यता कमी आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-लोकांची रस्त्यावर उतरुन मदत करणाऱ्या जोगिंदर शर्माचे या संस्थेकडून जोरदार कौतूक

-संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठी मदत केलेले ५ क्रिकेटर्स

-ज्या बीसीसीआयला लोकांनी ट्रोल केले, त्यांनी एका झटक्यात दिले एवढे कोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---