भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज सुरेश रैना हा आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु, सध्या आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आल्यामुळे तो तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत समालोचन करताना दिसून आला आहे. अशातच समालोचन करताना त्याने जातीवाचक शब्द उच्चारला होता. ज्यामुळे चाहत्यांनी त्याला धारेवर धरलं आहे. तसेच त्याने माफी मागावी अशी देखील मागणी केली जाऊ लागली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया.
तर झाले असे की, तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत सामना सुरू असताना सुरेश रैना समालोचन करत होता. या दरम्यान त्याला विचारण्यात आले होते की, तू दाक्षिणात्य संस्कृतीचा अवलंब कसा केला?
यावर उत्तर देत तो म्हणाला की,”मला वाटते की, मी ब्राम्हण आहे. मी चेन्नईमध्ये २००४ पासून खेळत आलो आहे. मला इथली संस्कृती आणि संघातील खेळाडू खूप आवडतात. मी अनिरुद्ध श्रीकांत, बद्रीनाथ , बालाभाई ( लक्ष्मीपती बालाजी) यांच्यासोबत खेळलो आहे. इथे आम्हाला स्वतःचा शोध घेण्याची परवानगी दिली जाते. मला इथली संस्कृती खूप आवडते.मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी या संघाचा एक भाग आहे.” (Suresh raina is in controversy due to his comment in TNPL fans trolling former Indian batsman on social media)
‘मी ब्राम्हण आहे’, असे सांगणाऱ्या सुरेश रैनाला क्रिकेट चाहत्यांनी धारेवर धरले आहे. तसेच त्याने माफी मागावी अशी देखील मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. लाईव्ह सामन्यामध्ये अशाप्रकारे रैनाने वक्तव्य केल्याचे चाहत्यांना पटलेले नाही. अनेक जणांना रैनाला म्हटले आहे की ‘तुला चेन्नईची खरी संस्कृती कळालेलीच नाही.’ सुरेश रैनाला चेन्नईच्या चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळते. चेन्नईमध्ये त्याला ‘चिन्ना थाला’ म्हणून संबोधले जाते.
https://twitter.com/suresh010690/status/1417184698980192270?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1417184698980192270%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-suresh-raina-is-in-controversy-due-to-his-comment-in-tamil-nadu-premier-league-match-fans-trolling-former-team-india-batsman-on-social-media-4246945.html
https://twitter.com/uday0035/status/1417223947142238211?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1417223947142238211%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-suresh-raina-is-in-controversy-due-to-his-comment-in-tamil-nadu-premier-league-match-fans-trolling-former-team-india-batsman-on-social-media-4246945.html
https://twitter.com/krithika0808/status/1417191966840803352
https://twitter.com/saandilyae/status/1417913672291160065
https://twitter.com/saandilyae/status/1417909591543717888
https://twitter.com/Sankul333/status/1417451894801199107
सुरेश रैनाने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून केली होती. तसेच तो आता ही या संघाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून काही चांगल्या खेळी खेळताना दिसून आला होता.
तसेच गतवर्षी १५ ऑगस्टला एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सुरेश रैनाने ही निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात देखील तो पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसून येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
खुशखबर! कोरोनाला धोबी पछाड देत रिषभ पंत टीम इंडियात दाखल; फोटो व्हायरल