---Advertisement---

पहिला आणि एकमेव; रोहित वा विराट नव्हे तर ‘या’ एकट्या भारतीय धुरंधराने टी२० विश्वचषकात ठोकलंय शतक

On: मंगळवार, ऑक्टोबर 18, 2022 9:00 AM
---Advertisement---

टी-२० क्रिकेट हे क्रिकेटचे सर्वात छोटे स्वरूप आहे. या स्वरूपात शतक झळकावणे सोपे नसते. त्यातही टी -२० विश्वचषक स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत शतक झळकावणे मुळीच सोपे नसते. टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आतापर्यंत ६ हंगाम झाले आहेत. या स्पर्धेत अनेक मोठ मोठे विक्रम घडले आहेत. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला आहे. परंतु एकमेव भारतीय फलंदाज आहे, ज्याला भारतीय संघाकडून टी-२० विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावण्यात यश आले आहे.

सुरेश रैनाने झळकावले होते तुफानी शतक
सुरेश रैना (Suresh Raina) हा एकमेव फलंदाज आहे, ज्याला आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावण्यात यश आले आहे. सुरेश रैनाने हे शतक २ मे २०१० रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात झळकावले होते. त्याने या डावात ६० चेंडूंचा सामना करत १०१ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ५ षटकार आणि ९ चौकार मारले होते. या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ५ बाद १८६ धावा करण्यात यश आले होते. तसेच युवराज सिंगने या डावात ३७ तर एमएस धोनीने १६ धावांचे योगदान दिले होते.

या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला २० षटकअखेर ५ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते. हा सामना भारतीय संघाने १४ धावांनी आपल्या नावावर केला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून फलंदाजी करताना जॅक कॅलिसने ७३ धावांची तुफानी खेळी केली होती. तर कर्णधार स्मिथने ३६ आणि एबी डिविलियर्सने ३१ धावांची तुफानी खेळी केली होती.

विराट कोहली सर्वोत्तम वैयक्तिक खेळीत दुसरा
सुरेश रैनानंतर भारतीय संघासाठी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावे आहे. विराट कोहलीने २०१६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ४७ चेंडूंमध्ये नाबाद ८९ धावांची खेळी केली होती. त्यामुळे आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सुरेश रैनाचा हा विक्रम विराट कोहली तोडू शकतो. तसेच त्याने आशिया चषक 2022च्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पहिले शतक केले.

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. भारतीय संघाची पहिली लढत २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात बुमराहच्या जागी शमीची एन्ट्री; मनातल्या भावना मांडत म्हणाला, ‘खूप मेहनत…’
पोटचा पोरगा स्टँड्सवरून कोसळला खाली, बापानेही त्याच्यामागं मारली उडी; टी20 विश्चषकातील व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---