India vs England Lord’s Test: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यान एक मुलाखत देऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बीसीसीआयने नियमांमध्ये बदल केले होते. (BCCI players family rule) परदेशी दौऱ्यावर खेळाडूंच्या कुटुंबांना बीसीसीआयने आता परवानगी देणे बंद केले आहे, ज्यावर सुपरस्टार विराट कोहलीने आक्षेप घेतला होता. (Virat Kohli objection) आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने बीसीसीआयच्या या नियमाला पाठिंबा दिला आहे. (Gautam Gambhir BCCI rule) तर, सुरेश रैनानेही या वादावर आपली भूमिका मांडली आहे. (Suresh Raina Virat Kohli)
आयपीएलदरम्यान विराट कोहलीने या नियमाचा विरोध केला होता, तर आता गौतम गंभीरने बीसीसीआयला पाठिंबा दिला आहे. या प्रकरणी बोलताना, भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना म्हणाला, “बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे की कुटुंबाला संपूर्ण दौऱ्यावर राहण्याची परवानगी नाही आणि मी याच्या विरोधात आहे. तुम्ही त्यांना 2 महिन्यांसाठी दौऱ्यावर पाठवत आहात आणि अशा परिस्थितीत कुटुंबाला सोबत राहण्याची परवानगी मिळायला पाहिजे. असे नाही की कुटुंब खेळाडूंच्या विरोधात आहे.” (Suresh Raina On BCCI Rule)
भारताचा माजी स्टार क्रिकेटर सुरैश रैनाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 18 कसोटी, 226 वनडे आणि 78 टी20 सामने खेळले आहेत. 19 कसोटी सामन्यात रैनाने 31 डावात फलंदाजी करताना 768 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 26.48 राहिली. कसोटीमध्ये त्याने 7 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. त्याच वेळी त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या 120 राहिली आहे. (Suresh Raina International Stats)
226 वनडे सामन्यांमध्ये रैनाने 194 डावात फलंदाजी करताना 93.50च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 5,615 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 36.31 राहिली आहे. वनडेमध्ये त्याने 36 अर्धशतकांसह 5 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 116 राहिली आहे. (Suresh Raina ODI Stats)
रैनाच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने 78 सामन्यांच्या 66 डावात फलंदाजी करताना 1,605 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 29.18 तर स्ट्राईक रेट 134.87 राहिला आहे. टी20 मध्ये त्याने 5 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. (Suresh Raina T20i Stats)






