---Advertisement---

‘त्या’ खेळाडूकडे घोडे असल्यामुळे रैना होणार त्याचा क्वारंटाइन पार्टनर

On: सोमवार, जून 1, 2020 5:50 PM
---Advertisement---

नवी दिल्ली । जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहेत. भारतात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन चालू आहे. तसेच आताची परिस्थिती पाहता हे आणखी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत. तसेच ते आपल्या चाहत्यांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. या दरम्यान खेळाडू चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतात, तर कधी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मुलाखत देत आहेत.

असंच एका लाईव्ह सेशनदरम्यान सुरेश रैनाला (Suresh Raina) चाहत्यांनी प्रश्न विचारला, की तुम्ही क्वारंटाइन दरम्यान कोणत्या खेळाडूला पार्टनर बनवण्यास पसंत कराल?, याप्रश्नाचे उत्तर देत रैनाने धोनीचे नाव न घेता सर्वांना आश्चर्यचकीत करून टाकले. तसेच त्याने सांगितले की, तो कोणत्या भारतीय खेळाडूला आणि कोणत्या विदेशी खेळाडूला क्वारंटाइन साथीदार बनवायला पसंत करेल.

निवेदिका रुपा रमाणीबरोबर बोलताना रैना म्हणाला, “तो भारतीय खेळाडू रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) आपला क्वारंटाइन साथीदार (Quarantine Partner) बनवण्यास पसंत करेल. तसेच विदेशी खेळाडूबद्दल बोलताना त्याने ड्वेन ब्रावोला आपला क्वारंटाइन साथीदार म्हणून पसंत केले.”

या खेळाडूंना निवडण्याचं कारण सांगताना रैना म्हणतो, की जडेजाला क्वारंटाइन साथीदार बनवण्याचा फायदा असा की त्याच्याबरोबर त्याच्या फार्महाऊसवर घोड्यांबरोबर वेळ घालवता येईल. याचा व्हिडिओ सीएसकेने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

रैना पुढे म्हणाला, “जडेजा एक मजेशीर व्यक्ती आहे. मला त्याच्या फार्महाऊसवर त्याच्या बरोबर क्वारंटाइन व्हायला आवडेल. त्यामुळे मी घोड्याची शर्यत शिकू शकेल, तर ब्रावोबद्दल बोलायचं झालं तर तो मला कायम खुश ठेवेल. त्याच्या बरोबर गाणी बनवेल आणि याबरोबरच तो नाचून सुद्धा मनोरंजन करेल. तो सकारात्मक विचाराचा व्यक्ती आहे.”

आपल्याला माहित आहे, की हे तिन्ही खेळाडू चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळतात. ड्वेन ब्रावोला मैदानात आणि मैदानाबाहेर आपल्या मनोरंजनासाठी ओळखले जाते. २०१६ मध्ये त्याने एक गाणंही तयार केलं आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-विराट म्हणतो… ‘हा’ खेळाडू लागलाय माझ्या पाठीमागे

-तू उद्या सकाळी माझ्या जागी भारतीय संघातून पदार्पण करतोय

-लॉक डाऊनमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ शिलेदाराने गुपचूप उडवला लग्नाचा बार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---