भारतीय क्रिकेट संघाला चालू वर्षात सर्वात मोठे आव्हान हे वनडे विश्वचषक जिंकण्याचे असणार आहे. यावेळी विश्वचषकाचे आयोजन केवळ भारतात होत असल्याने भारताला विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानले जातेय. विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणते खेळाडू हवेत याबाबत अनेक माजी क्रिकेटपटू व समीक्षक आपले मत व्यक्त करत आहेत. त्याचवेळी भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने युवा अष्टपैलू दीपक हुडा याला विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची इच्छा व्यक्त केली.
रैना नुकताच एका क्रीडा वृत्तवाहिनीशी बोलत होता. त्यावेळी बोलताना त्याने विश्वचषकासाठीच्या संघातील काही नावे घेतली. भारतीय संघात दीपक हुडा याला वारंवार संधी मिळावी असे वक्तव्याने त्याने केले. तो म्हणाला,
“विश्वचषकासाठी दीपक एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे संघाला संतुलन प्राप्त होते. आपण विश्वचषक जिंकला त्यावेळी भारतीय संघात असे काही खेळाडू होते, जे उत्कृष्ट फलंदाज असल्यासोबतच वेळप्रसंगी गोलंदाजी देखील करत. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, मी आणि युसुफ पठाण असेच खेळाडू होतो जे कर्णधाराने सांगितल्यानंतर तात्काळ गोलंदाजासाठी उपलब्ध होतो. त्याचवेळी युवराज सिंग हा संघाचा एक्स फॅक्टर होता. भारतातील खेळपट्ट्यांवर तुम्हाला अशा खेळाडूंची गरज पडते.”
हुडाचे कौतुक करताना रैना म्हणाला,
“विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून त्याला अधिक संधी द्यायला हवी. तो आक्रमक फलंदाज असल्यासोबतच उपयुक्त गोलंदाज देखील आहे. याशिवाय क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्याची वेगळी छाप पडते. टी20 क्रिकेटमधील फॉर्म आपल्याला वनडेमध्ये उपयोगी येऊ शकतो.”
मागील अनेक वर्षांपासून आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर, हुडाला 2021 मध्ये भारतीय संघात स्थान मिळाले होते. टी20 क्रिकेटमध्ये त्याने आत्तापर्यंत 21 सामने खेळताना दखल घेण्यासारखी कामगिरी केली आहे. मात्र, वनडेत तो फक्त 10 सामने खेळू शकला आहे.
(Suresh Raina Said Deepak Hooda Have Quality Like Sachin Tendulkar And Virendra Sehwag)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी अस ऐकलंय की, ही धोनीची शेवटची आयपीएल आहे…’, कॅप्टन कूलविषयी काय म्हणाला शेन वॉटसन?
जेमिसनच्या जागी सिसांडा मगाला सीएसकेच्या ताफ्यात, जाणून घ्या नवख्या खेळाडूवर विश्वास दाखवण्याचे कारण