भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना येत्या २७ नोव्हेबंरला त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करणार आहे. हा वाढदिवस तो वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहे. तो त्याची मुलगी ग्रेसियाच्या नावावर सुरु केलेल्या ‘ग्रेसिया रैना फाऊंडेशन’च्या मदतीने समाजसेवेचे काम करणार आहे.
तो उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मिर आणि दिल्ली एनसीआर मधील ३४ सरकारी शाळांना मदत करणार आहे. या शाळांमध्ये तो स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. या ३४ शाळांमध्ये मिळून १० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे या सर्वांना रैनाकडून मदत मिळणार आहे.
रैना स्वच्छ भारत अभियानाचाही ब्रँड अँबेसेडर आहे. रैनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘मला अशा प्रकारे माझा वाढदिवस साजरा करताना आनंद होत आहे. प्रत्येक मुलास दर्जेदार शिक्षणाचा हक्क आहे. शाळांमधील स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा हा त्यांचा हक्क आहे. मला आशा आहे की युवकांच्या सहकार्याने आम्ही ग्रॅसिया रैना फाउंडेशनच्या वतीने महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकू.’
रैनाबरोबर त्याची पत्नी प्रियंका रैना देखील महिलांसाठी सामाजिक काम करत असते.
रैनाने याचवर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळले असून २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माचे माजी दिग्गजाला चोख प्रत्युत्तर; म्हणाला…
बुम बुम इझ बॅक! ४० वर्षीय आफ्रिदी पुन्हा बनला कर्णधार
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बाऊचरचा खुलासा, ‘मला कोरोना झाल्याची कल्पनाच नव्हती’
ट्रेंडिंग लेख –
वडिलांचं निधन झाल्यावरही देशासाठी मैदानावर लढलेले ३ भारतीय क्रिकेटर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात