कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट हळू-हळू पुन्हा सुरू होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात ८ जुलैपासून सुरू झालेल्या कसोटी मालिकेतून कोरोना दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले होते. यानंतर बीसीसीआयनेही कोरोना दरम्यान युएईमध्ये आयपीएल २०२०चे आयोजन केले. त्यानंतर आता श्रीलंकेतील मोठी टी२० स्पर्धा लंका प्रीमियर लीगला २६ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा समावेश असून त्याच्याकडे एलपीएलमधील एका संघाने कर्णधारपद सोपवले आहे.
एलपीएलमध्ये गाले संघाने शाहिद आफ्रिदीला बनवले कर्णधार
एलपीएलमध्ये शाहिद आफ्रिदी, फाफ डू प्लेसिस आणि आंद्रे रसेल यांसारख्या मोठ्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. यादरम्यान गाले ग्लेडिएटर्स संघाने आपल्या कर्णधाराची निवड केली आहे. गाले संघाने आपल्या संघाचे कर्णधारपद ४० वर्षीय अष्टपैलू शाहिद आफ्रिदीकडे सोपवले आहे.
आफ्रिदीने केले आहे पाकिस्तान संघाचे नेतृत्त्व
जागतिक विस्फोटक खेळाडूंमध्ये आफ्रिदीच्या नावाचा समावेश होतो. आफ्रिदीने ८२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्याने पाकिस्तान संघाकडून खेळताना २७ कसोटी सामने, ३९८ वनडे सामने आणि ९९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३६.५१ च्या सरासरीने १७१६ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने २३.५७ च्या सरासरीने ८०६४ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने टी२०त १७.९२ च्या सरासरीने १४१६ धावा केल्या आहेत.
याव्यतिरिक्त गोलंदाजीबाबत बोलायचं झालं, तर त्याने कसोटीत ४८, वनडेत ३९५ आणि टी२०त ९८ विकेट्स घेतल्या आहेत.
असा आहे गाले ग्लेडिएटर्स संघ
अहसान अली, शाहिद आफ्रिदी, हजरतुल्ला झझाइ, मोहम्मद आमिर, धनुष्का गुणतिलका, अकिला धनंजया, मिलिंडा सिरीवर्दना, आझम खान, लक्षण संदाकन, शेहान जयसूर्या, असिथा फर्नांडो, नुवान तुषारा, मोहम्मद आमिर, भानुका राजपक्षे, सहान अराचचिज, दुविंदु तिलकरत्ने, धनंजय लक्षण, लसिथ मलिंगा, चनाका रुवान्सिरी, मोहमद शिराज, चॅडविक वॉल्टन,
महत्त्वाच्या बातम्या-
शोएब मलिक, मोहम्मद आमिर यांच्या सामना शुल्कात वाढ; पाहा किती मिळणार रक्कम
ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये १७६ सामने खेळलेल्या खेळाडूला मिळाली लंका प्रीमियर लीगमध्ये संधी