आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारतीय संघाचा खेळाडू सुरेश रैना हा त्याच्या ट्विट्सने सध्या चर्चेत येत आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम गुजरात टायटन्स या नवख्या संघाच्या अंतिम सामन्यातील विजयाने संपला. यावेळी गुजरातने राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव केला. या हंगामाच्या लिलावात मिस्टर आयपीएल अर्थातच रैनाला कोणीच विकत घेतले नाही.
दरम्यान नुकताच रैनाने गदा हातात घेत वर्कआऊट करतानाचा व्हि़डीओ त्यानेच ट्विट करत पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) June 1, 2022
रैना (Suresh Raina) आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. २०२२च्या लिलावात त्याची दोन कोटी मुळ किंमत असताना तो अनसोल्ड राहिला होता. त्याचा पूर्वीचा संघ चेन्नई सुपर किंग्जनेही त्याच्यात रस दाखवला नाही.
आयपीएलचे १४ हंगाम खेळताना रैनाने २०५ सामन्यांत ५५२८ धावा केल्या आहेत. तर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) ६६२४ धावा करत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर शिखर धवन (Shikhar Dhawan), डेविड वॉर्नर आणि रोहित शर्मा यांचा क्रमांक लागतो.
पंधराव्या आयपीएलमध्ये चेन्नई संघ गुणतालिकेत शेवटून दुसरा राहिला. त्यांनी १४ पैकी ४ हंगाम जिंकले आहेत. यांमध्ये रैनाने महत्वाची खेळी करत संघाला अनेक विजय मिळवून दिले आहे.
https://www.instagram.com/reel/CeS2farJXXm/?utm_source=ig_web_copy_link
“चेन्नई संघाने मागील अनेक हंगामात अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्यामध्ये रैनाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघाला अनेक विजय मिळवून दिले आहे. त्याने चेन्नई संघासाठी दिलेले योगदान काही जण विसरून जातात. तो जेव्हा फलंदाजीला येतो, तेव्हा तो संघाचा भार मोठ्या प्रमाणात कमी करतो,” असे मत काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘चिन्ना थाला’ रैना विषयी दिले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मयंक अगरवालने IPL 2022मध्ये का केली खराब कामगिरी? हरभजन सिंगने दिले स्पष्टीकरण
‘गब्बर’ पडलाय प्रेमात! व्हिडिओ शेअर करत धवनने लिहिले, ‘मोहम्मत मैं बादशाह भी गुलाम बन जाता है’
‘आता तुझे फॉलोव्हर्स वाढले असतील’, भारतीय दिग्गजाला पोलार्डने झापले, नंतर ट्वीटही केले डिलीट