---Advertisement---

टी20 विश्वचषकापूर्वी सुरेश रैनानं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “भारतीय संघाची जिंकण्याची…”

On: शुक्रवार, मे 31, 2024 8:48 PM
jaiswal and shivam dube
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाला वाटतं आहे की, टी20 विश्वचषकात तोच संघ बाजी मारेल जो संघ न भिता विस्फोटक अंदाजात फलंदाजी करेल. सुरेश रैना म्हणाला, “भारतीय संघाची जिंकण्याची क्षमता तेव्हाच वाढेल जेव्हा भारतीय संघ त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांना संघात खेळण्यासाठी संधी देईल.” युवा खेळाडू यशस्वी जयस्वालचा पहिलाच टी20 विश्वचषक आहे. जयस्वाल हा भारतीय संघात एकमेव खेळाडू आहे. ज्याचं वय सर्वात कमी आहे.

यंदाच्या टी20 विश्वचषकाची सुरुवात 2 जूनपासून होणार आहे. भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत दाखल झाला आहे आणि भारतीय संघाने सरावदेखील चालू केला आहे. 1 जून रोजी भारताचा सराव सामना बांग्लादेशविरुद्ध आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली नसणार आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश हा सामना नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात 20 संघांनी सहभाग नोंदवला आहे तर टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी खेळला जाणार आहे.

सुरेश रैना म्हणाला, “भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेला संधी मिळाली पाहिजे. परंतु  त्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माला कठीण निर्णय घ्यावे लागतील. यशस्वी जयस्वालनं रोहित शर्मासोबत सलामीला आलं पाहिजे आणि विराट कोहलीनं तिसऱ्या स्थानी फलंदाजी केली पाहिजे. कारण तिथल्या खेळपट्ट्या स्लो आहेत. त्यामुळे जलद गतीने धावा चोरणारे फलंदाज पाहिजेत ती क्षमता विराट कोहलीमध्ये आहे. विराट कोहलीला ‘रन मशीन’ आणि ‘चेज मास्टर’ म्हणतात. संघाच्या शेवटच्या षटकात फलंदाजी करण्यासाठी रिषभ पंत आणि शिवम दुबेसारखे मोठे फटके खेळणारे खेळाडू आहेत”

महत्त्वाच्या बातम्या-

टी20 विश्वचषकासाठी ‘हा’ संघ आहे प्रबळ दावेदार गाठू शकतो अंतिम फेरी
टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यावरच पावसाच सावट! टेक्सासमध्ये दररोज पडतोय पाऊस
मेगा लिलावात इतकेच खेळाडू कायम ठेवता येतील, संघांना बसला धक्का!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---