---Advertisement---

सुरेश रैनाच्या मुलाचा वाढदिवस झाला साजरा, पाहा ज्युनियर रैनाचे गोंडस फोटो

---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैना येत्या ९ एप्रिलपासून सुरू होणार्‍या आयपीएलद्वारे मैदानावर पुनरागमन करतांना दिसणार आहे. मागील आयपीएलमधून त्याने कौटुंबिक कारणांमुळे माघार घेतली होती. चेन्नईचे मागील हंगामातील प्रदर्शन देखील फारसे समाधानकारक नव्हते. पण आता यंदाच्या हंगामात चेन्नईला जेतेपद मिळवून देण्यासाठी रैना कसोशीने प्रयत्न करेल.

मात्र आता आयपीएलपूर्वी एका वेगळ्याच कारणाने रैना चर्चेत आला आहे. आणि यावेळी चर्चेचे कारण सिनियर रैना नसून, ज्युनियर रैना आहे. रैनाच्या मुलाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चेत आहेत.

सुरेश रैनाचा मुलगा झाला एका वर्षाचा
सुरेश रैनाचा मुलगा नुकताच २३ मार्चला एका वर्षाचा झाला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियंका यांनी मोठी पार्टी दिली. यात सुरेश रैना आणि त्याचा मुलगा यांनी एकाच प्रकारचा ड्रेस घातल्याचे दिसून आले.

या फोटोंना चाहत्यांची जोरदार पसंती मिळत असल्याचे दिसून आले. या सगळ्याच फोटोंमध्ये जुनियर रैना म्हणजेच रियो आपल्या वडिलांना कॉपी करत असल्याचे दिसून आले. कुर्ता-पायजमा, जाकिट असा वडिलांचा पेहेराव रियोने कॉपी केल्याचे दिसले. केक कापताना रियोने घातलेला ड्रेस देखील त्याच्या वडिलांना कॉपी करणाराच होता.

https://www.instagram.com/p/CMzlGdbBdXz/

रियो, हे रैना दाम्पत्याचे दुसरे अपत्य आहे. रियो आधी त्यांना एक ५ वर्षाची मुलगी असून तिचे नाव ग्रेसिया असे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध-कृणालने उधळले इंग्लंडचे मनसुबे; पाकिस्तानी दिग्गज म्हणाले, ‘भारतात क्रिकेटर जन्माला घालणारी मशीन’ 

चेन्नई सोडून आता मुंबईला रवाना होणार धोनी आणि कंपनी, ‘हे’ आहे कारण

मुंबई इंडियन्सचा आश्चर्यकारक निर्णय, केवळ दोन प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या खेळाडूची संघात केली निवड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---