वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियने 10 विकेट्स राखून विजय मिळवला. पण ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी एक वेदानादायक घटना या सामन्यात घडली. सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा खेळपट्टीवर असताना वेगवान शमर जोसेफ याने घात बाऊंसर टाकला. हा चेंडू ख्वाजाच्या हेलमेटवर लागला असून त्याला उपचारासाठी मैदानाबाहेर देखील नेले गेले.
वेस्ट इंडीज संघ दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. दौऱ्यातील पहिला सामना वेस्ट इंडीजने कसोटी फॉरमॅटमध्ये खेळला. एडिलेमध्ये उभय संघांतील कसोटी मालिका सुरू झाली. पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (18 जानेवारी) उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याला शमर जोसेफ (Shamar Joseph) याने टाकलेल्या बाऊंसरवर दुखापत झाली. सामना निकाली निघण्याच्या अवघ्या दोन चेंडू आधी ख्वाजाला ही दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 26 धावांचे लक्ष्य मिळाले होते. अवघ्या 6.4 षटकामध्ये ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य गाठले आणि सामना नावावर केला.
शेवटच्या डावात शमर जोसेफने टाकेलला बाऊंसर चेंडूत उस्मान ख्वाजाच्या हेलमेटवर जाऊन लागला. हा चेंडूचा वेग जास्त असल्यामुळे ऑस्ट्रेलियन सलामीवीर वेदनेत दिसला. मैदानात उपस्थित प्रत्येकाला ख्वाजाच्या दुखापतीची चिंता वाटू लागली आणि तत्काल उपचारासाठी त्याला रुग्णालयात हलवले गेले. लाईव्ह सामन्यात ख्वाजाच्या तोंडातून रक्त आल्याने ही गंभीर दुखापत असल्याचा अंदाज चाहत्यांना आला होता. पण सुदैवाने सलामीवीराला कुठली गंभीर दुखापत झाली नाहीये. लकरच त्याला फिट घोषित केले जाऊ शकते. तो कनकशनमध्ये पास झाला आहे. पण मालिकेतील दुसऱ्या कसोटीत तो खेळेल याची खात्री देता येणार नाही.
A nasty moment as Usman Khawaja is hit on the chin by a Shamar Joseph short ball #AUSvWI pic.twitter.com/nF5nFqxgJJ
— cricket.com.au (@cricketcomau) January 19, 2024
ख्वाजाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही त्याच्या फिटनेसची माहिती सर्वांसोबत शेअर केली. पोस्टमध्ये त्याने मार्नस लॅबुशेन याचा उल्लेख करत सर्वांना हसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने लिहिले की, “सर्वांना प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. मी ठीक आहे. फक्त मार्नसलाही चेंडू लागला पाहिजे होता!”
View this post on Instagram
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात वेस्ट इंडीजने 188, तर ऑस्ट्रेलियाने 120 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 283 धावा करून बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्यांनी एकही विकेट न गमावता विजय मिळवला. (Survived with a broken jaw…, fast bouncer drew blood from Khwaja’s mouth, watch VIDEO)
महत्वाच्या बातम्या –
NZ vs PAK : बाबर-रिजवानची सलामी जोडी फोडल्याने भडकला दिग्गज, बाबरचे समर्थन करण्याबाबत मोठे विधान
FIH । सेमीफायनल पाहायला मैदानात धोनीने लावली हजेरी, कॅप्टन कूलचा लूक पाहून तुम्हीही कराल कौतुक