भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना पावसामुळे निकाली होऊ शकला नाही. हेमिल्टन सेडन पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवने मात्र सर्वांचे लक्ष वेधले. सूर्यकुमारने नाबाद 34 धावांची खेळी केलीच, पण अजून एका कारणास्तव तो चर्चेत राहिला. सामना सुरू होण्यापूर्वी मैदानातील पाणी काढणाऱ्या सुपर सॉपर गाडीत तो बसलेला दिसला.
रविवारी (27 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने 7 विकेट्सच्या अंतराने गमावला होता. अशात मालिकेतील हा दुसरा सामना भारतासाठी अधिक महत्वाचा ठरणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना निकाली निघू शकला नाही. पावसामुळे सामना सुरू होण्यासाठी चार तास उशीर झाला होता. याच पार्श्वभूमीवर पंचांना दोन्ही संघांना 29-29 षटके खेळवण्याचा निर्णय घेतला.
पावसामुळे सामना उशीर सुरू झाला असला, तरी सूर्यकुमार यादव मात्र त्याला खेळण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले. पाऊस थांबल्यानंतर मैदानातील पाणी बाहेर काढण्यासाठी सुपर-सॉपर गाडी मैदानात आली. यावेळी सूर्यकुमार देखील या गाडीत बसल्याचे चाहत्यांना पाहायला मिळाले. न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या ट्वीटर खात्यावरून सूर्यकुमार यादवचा हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “सेडन पार्कच्या ग्राउंड स्टाफची मदत करताना सूर्यकुमार यादव.” व्हिडिओत सूर्या या गाडीच्या चालकासोबत चर्चा करताना दिसत आहे. सूर्यकुमार फलंदाजी करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे, असा अंदाजा चाहेत लावत आहेत.
The @seddonparknz ground staff gets some assistance from @surya_14kumar 🏏 #NZvIND pic.twitter.com/0N856oLZfL
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 27, 2022
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीला आला. 29 षटकांच्या या सामन्यात अवघ्या 12.5 षटकांचा खेळ होऊ शकला. यादरम्यान भारताने एका विकेटच्या नुकसानावर 89 धावा केल्या. सलामीवीर आणि कर्णधार शिखर धवन 10 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. संघाचा दुसरा सालामीवीर शुबमन गिल नाबाद 42, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमार यादव नाबाद 34 धावांची खेळी करू शकले. उभय संघांतील तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (30 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. (Suryakumar himself took the initiative to remove the water from the ground, the video is going viral.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी: क्रिकेटजगतात पुन्हा फिक्सिंगचे भूत? पाकिस्तानचा ‘तो’ सामना होता फिक्स
‘मिस्टर 360 नाही 720 डीग्री…’, सूर्याचा रिव्हर्स स्वीप षटकार पाहून चाहते भलतेच खुश