धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वोत्तम भूमिका निभावली आहे. गेल्या तीन हंगामात मुंबईचा सर्वात धडाकेबाज फलंदाज म्हणून काम करणाऱ्या सूर्यकुमारने 16 सामन्यांत 480 धावा केल्या असून यामध्ये काही सामन्यात विजयी खेळीदेखील केली आहे. त्याने संपूर्ण हंगामात आपल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. यानंतर तो आता विराट कोहलीबाबतचे एक ट्वीट लाईक केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कोहलीला ट्रोल करणारा ट्वीट केला लाईक
सूर्यकुमारच्या विजयी खेळीमुळे जगाच्या काना- कोपऱ्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बेंगलोरचा कर्णधार कोहलीने स्लेजिंग करूनही स्वतःवर नियंत्रण ठेवत त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्यानंतर आता त्याने नुकतेच ट्विटरवरुन भारतीय कर्णधार विराट कोहलीला ट्रोल करणारे वादग्रस्त ट्वीट लाईक केले. एका चाहत्याने शेअर केलेल्या मिममध्ये कोहलीचा ‘पेपर कॅप्टन’ असा उल्लेख केला होता.
सूर्यकुमारने या ट्विटला लाईक केले होते, नंतर ते त्याने रिमूव्ह केले. पण स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.
https://twitter.com/___ItsMyOpinion/status/1328256380583649280
निवड न झाल्याने सूर्यकुमार आला चर्चेत
ऑस्ट्रेलियाविरूद्ध आगामी टी -20 मालिकेसाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय संधीच्या जवळ असूनही निवड समितीने बाजूला सारल्यानंतर सूर्यकुमार चर्चेत आला. संघातून त्याला वगळल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आणि सोशल मीडियावर जोरदार खळबळ उडाली. आयपीएल 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमारने नाबाद 79 धावा ठोकल्या.
सूर्यकुमारचे होणार का भारतीय संघात लवकर आगमन?
गेल्या तीन हंगामापासून मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीमध्ये सूर्यकुमारचा मोलाचा वाटा आहे. त्याने आयपीएल 2018 मध्ये 14 सामन्यांत 512 धावा केल्या. त्यानंतर त्याने 2018 च्या हंगामात 16 सामन्यांत 424 धावा करुन मुंबईला किताब जिंकवून दिला. यावर्षी, त्याने 40 च्या सरासरीने आणि 145 पेक्षा जास्तीच्या स्ट्राइक रेटने सलग तिसर्या हंगामात 400 धावांचा टप्पा ओलांडला.
महत्त्वाच्या बातम्या-
“सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या फ्लाइटमध्ये असायला हवे”
“सूर्यकुमार यादव होईल मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार”, पाहा कोणी केलीय भविष्यवाणी
‘माझं मन मानायला तयार नाही; सूर्यकुमारची…’, माजी दिग्गजाचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…