---Advertisement---

भारतीय धुरंधर सूर्यकुमार यादव उत्कृष्ट कामगिरी करूनही आहे नाराज, स्वतः सांगितले त्यामागचे कारण

On: गुरूवार, जुलै 22, 2021 7:24 AM
---Advertisement---

श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पदार्पणवीर सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा बनविल्या होत्या. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात सूर्यकुमारचे देखील महत्त्वाचे योगदान होते. यानंतर आपल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 53 धावांची खेळी होती. परंतु, सूर्यकुमार उत्कृष्ट प्रदर्शन करूनही निराश आहे. स्वत: सूर्यकुमारने यामागचे कारण सांगितले आहे.

सामन्यानंतर सूर्यकुमार भावनिक झाला
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने आपल्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यातील क्षण आठवले आणि सांगितले की, ‘एकदिवसीय संघात जागा मिळविणे ही माझ्यासाठी भावनिक वाटचाल होती. परंतु, त्याक्षणी कोरोना व्हायरसमुळे माझे कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित नसल्याने मी नाराज झालो आहे.’

परंतु, पहिल्या एकदिवसीय सामन्याचा आनंद घेतल्याबद्दल सूर्यकुमार म्हणाला की, ‘मला खूप मजा आली. मी गेली दोन वर्षे अशीच कामगिरी करीत आहे आणि नेटमध्ये केलेल्या गोष्टी पुन्हा मैदानावर करण्याचा प्रयत्न करीत आहे. मला वाटते की, या खेळाबद्दलच्या माझ्या उत्कटतेने मला आतापर्यंत जिवंत ठेवले आहे. माझ्या वडिलांनी नेहमीच धीर धरण्याचा सल्ला दिला आहे. मला खात्री आहे की मला नक्की पुढेही अशीच संधी मिळेल.’

महत्त्वाचे म्हणजे सूर्यकुमार यादव पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 व्या स्थानावर फलंदाजी करण्यास गेला होता. तो सहसा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. परंतु एकदिवसीय सामन्यात त्याला मिळालेल्या या स्थानामुळे तो आनंदी आहे.

याबाबत तो म्हणाला की, ‘टी20 मध्ये मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. परंतु, जेथे संघ मला संधी देईल, मी त्यासाठी तयार आहे. मला फक्त माझा फॉर्म सांभाळायचा आहे.’

श्रीलंकाविरुद्धची एकदिवसीय आणि टी20 मालिका सुर्यकुमार यादवसाठी भारतीय संघात स्थान निश्चित करण्याची चांगली संधी आहे. कारण टी20 विश्वचषक ऑक्टोबरमध्ये होणार असून सूर्यकुमारला संघात स्थान मिळवायचे असेल, तर त्याला कोलंबोमध्ये होणाऱ्या सामन्यांत उत्कृष्ट फलंदाजी करावी लागले. याआधी त्याने इंग्लंडविरुद्ध टी20 मध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. सूर्यकुमारने 3 टी20 सामन्यात 44.50 च्या सरासरीने 89 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये अर्धशतकाचा देखील होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

आता प्रत्येकाला तोंडपाठ होणार ‘धोनीगाथा’, शाळेतील मुलं शिकणार ‘कॅप्टनकूल’चा धडा? पुस्तकाचा फोटो व्हायरल

अरेरे! रोहितच्या आवडत्या शॉटनेच केला गेम, सराव सामन्यात ‘असा’ झाला दुर्दैवीपणे बाद

फलंदाजाला फसवायचंय? मग चाहरकडून शिका! दीपकने उडवल्या लंकन फलंदाजाच्या दांड्या; व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---