भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना आज (१४ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्याद्वारे युवा भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचे टी२० पदार्पण झाले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याने सूर्यकुमार आणि इशान यांना अंतिम ११ जणांच्या पथकात संधी दिली आहे.
२२ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज इशान याला शिखर धवनच्या जागी सहभागी करण्यात आले आहे. त्यामुळे तो केएल राहुलसोबत सलामीला फलंदाजी करताना दिसेल. तर अष्टपैलू अक्षर पटेल याला विश्रांती देत त्याच्याजागी ३० वर्षीय धाकड फलंदाज सूर्यकुमारला संधी देण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने इशान आणि सूर्यकुमारला टी२० कॅप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
अशी राहिली इशान किशनची कामगिरी
डावखुरा फलंदाज इशानने आयपीएलमधील त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत भारतीय संघात जागा मिळवली आहे. मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज असलेल्या इशानने आतापर्यंत ५१ आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ७ अर्धशतकांच्या मदतीने १२११ धावा केल्या आहेत. तर देशांतर्गत क्रिकेटचे मैदानही त्याने गाजवले आहे. ४४ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने २६६५ धावा केल्या आहेत. तर ११ अ दर्जाच्या सामन्यात २५४९ धावा आणि ९५ देशांतर्गत टी२० सामन्यात २३७२ धावा केल्या आहेत.
अशी राहिली सूर्यकुमार यादवची कामगिरी
सूर्यकुमारनेही आयपीएलमधील त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचे दरवाजे आपल्यासाठी उघडे केले आहेत. मुंबई इंडियन्सच्या या धाकड फलंदाजाने आतापर्यंत १०१ आयपीएल सामन्यात २०२४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये ७७ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ५३२६ धावा चोपल्या आहेत. तर ९८ अ दर्जाच्या सामन्यात २७७९ धावा आणि १७० देशांतर्गत टी२० सामन्यात ३५६७ धावांची खात्यात नोंद केली आहे.
BIG DAY for @surya_14kumar & @ishankishan51 who are all set for their T20I debuts 😎😎
What a moment for these two 🧢💙 #TeamIndia 🇮🇳🇮🇳#INDvENG @Paytm pic.twitter.com/cFVVxDgvIO
— BCCI (@BCCI) March 14, 2021
INDvsENG 2nd T20 Live : टाॅस जिंकून भारताचा बाॅलिंगचा निर्णय; ‘या’ दोन भारतीयांचे पदार्पण
अंतिम सामन्यात मुंबईने दिली उत्तर प्रदेशला मात, पटकावले यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद