इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताच्या विजयाचा नायक तिलक वर्मा होता. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या या खेळाडूने 166 धावांच्या पाठलागात 72 धावांची नाबाद खेळी केली. बदलत्या चेन्नईच्या खेळपट्टीवर जिथे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकत नव्हते. तिथे 23 वर्षीय खेळाडूची अशी कामगिरी पाहून कर्णधार सूर्यकुमार यादवही प्रभावित झाला. यानंतर तिलक वर्मानी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे मन जिंकले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 165 धावा केल्या होत्या ज्या भारताने 2 विकेट आणि 4 चेंडू शिल्लक असताना हा धावसंख्या गाठली.
जेमी ओव्हरटनच्या शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तिलक वर्माने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. यानंतर, भारतीय खेळाडूंमध्ये उत्साह पाहण्यासारखा होता. तिलक वर्माने हवेत उडी मारली आणि त्याचा ट्रेडमार्क सेलिब्रेशन केला.
नंतर, खेळाडू हस्तांदोलन करून पॅव्हेलियनकडे परतत असताना, कर्णधार सूर्यकुमार यादव आला आणि त्याने 22 तिलकला नमस्कार केला. तिलक वर्माने लगेचच त्या सूर्यासमोर नतमस्तक होऊन कर्णधाराकडून कौतुकाचा स्वीकार केला. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर टीम इंडियाच्या विजयी सेलिब्रेशनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पाहा व्हिडिओ-
2️⃣-0️⃣ 🙌
Tilak Varma finishes in style and #TeamIndia register a 2-wicket win in Chennai! 👌
Scorecard ▶️ https://t.co/6RwYIFWg7i #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/d9jg3O02IB
— BCCI (@BCCI) January 25, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लिश संघाची पुन्हा एकदा वाईट सुरुवात झाली. दोन्ही सलामीवीर फिल साल्ट (4) आणि बेन डकेट (3) स्वस्तात परतले. गेल्या सामन्याप्रमाणे यावेळीही कर्णधार जोस बटलर संघाचा तारणहार ठरला. तो संघाचा सर्वाधिक 45 धावा करणारा फलंदाज होता. शेवटी, ब्रायडन कार्सेने 17 चेंडूत 31 धावा करत संघाला 165 धावांपर्यंत पोहोचवले.
166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियालाही चांगली सुरुवात मिळाली नाही. गेल्या सामन्याचा हिरो अभिषेक शर्मा 12 धावा काढून बाद झाला तर संजू सॅमसन 5 धावा काढून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्माला मधल्या फळीत कोणतीही साथ मिळाली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासारखे अनुभवी खेळाडूही जास्त काळ क्रीजवर टिकू शकले नाहीत.
तिलकने वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांच्यासोबत छोट्या भागीदारी करून संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. तिलक वर्माला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा-
या संघाने टी20 फ्रँचायझी क्रिकेटमध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारी पहिलीच टीम
तिलक वर्माने रचला विश्वविक्रम, शेवटच्या 4 डावात नाॅट-आऊट, खेचल्या एवढ्या धावा
Padma Awards; टीम इंडियाच्या ‘वाॅल’ला पद्मभूषण, या खेळाडूंनाही मिळणार सन्मान